अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या अध्यक्षपदी श्री. प्रविण थोरात यांची नियुक्ती तर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर.

अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

पिंपळनेर – येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघाची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तर सर्व सदस्यांना आय कार्ड वितरण सोहळा शासकीय विश्राम गृह पिंपळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. श्री. सचिन कापडणीस साहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्म. आ.मा पाटील विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. पी. एच. पाटील सर व माजी प्राचार्य मा. श्री.ए बी. मराठे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा शाल ,श्रीफळ ,गुलाबपुष्प व माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची पॉकेट डायरी भेट देऊन सन्मान करण्यात आला.

अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक आदरणीय श्री. कांतीलालजी जैन साहेब यांच्या शिफारशीवरून केंद्रीय अध्यक्ष मा. श्री. एम.यु .दुवा साहेब यांच्या आदेशाने पिंपळनेर येथील कार्यकारणी पुढील पाच वर्षासाठी जाहीर करण्यात आली. ती खालील प्रमाणे

  • श्री.प्रविण शंकरराव थोरात( अध्यक्ष),
  • श्री. रावसाहेब आनंदराव शिंदे ( ॲडव्हायझर)
  • श्री. प्रमोद यशवंत जोशी (सेक्रेटरी )
  • श्री.अनिल भाईदास महाले ( सेक्रेटरी)
  • श्री. भरत कांतीलाल बागुल (जॉइंट सेक्रेटरी)
  • श्री. चंद्रकांत भिकनराव अहिरराव (प्रेस सेक्रेटरी).
  • श्री.पराग प्रकाश महाजन (ऑर्गनाइज सेक्रेटरी)
  • श्री. दिनेश कालिदास भालेराव (रिपोर्टिंग ऑफिसर)
  • श्री. किरण दत्तात्रय शिनकर ( ऑर्गनाईज सेक्रेटरी)
  • श्री. हंसराज दयाराम शिंदे (ऑफिस सेक्रेटरी )
  • श्री.प्रशांत जगन्नाथ कापडणीस (पब्लिसिटी ऑफिसर) तसेच
  • श्री.सोमनाथ रामदास बागुल,
  • श्री. अरुण पुंडलिक गांगुर्डे,
  • श्री. हितेंद्र दौलत चौधरी,
  • श्री. मुकुंद गोविंद खैरनार
  • श्री. धनंजय काळू देवरे, व
  • श्रीमती. भिमाबाई उखाराम चौरे( सिनिअर मेंबर्स) म्हणून यांची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे प्रमुख पाहुणे

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सर्व सदस्यांना आय कार्ड चे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे कर्म.आ.मा. पाटील विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.ए.बी. मराठे सर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे साक्री तालुका अध्यक्ष श्री.कैलास भदाणे सर व उपाध्यक्ष श्री.रोहिदास सावळे सर उपस्थित होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा. श्री. अनिल महाले सर यांनी केले.

Related News Post : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !