उमरदा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात संपन्न.
शिरपूर: तालुक्यातील उमरदा गावात आदिवासी आश्रमशाळा चे विध्यार्थी सह गावाचे तरुण युवा मुलांनी विश्व्आ दिवासी दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी क्रांतीवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या चिमुकल्यांनी आदिवासी पेहराव परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधून आदिवासी दिवस उत्साहात साजरा झाला.
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस.
दरवर्षी 9 ऑगस्ट ला सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेड्यापाड्यात व तालुक्यात जल्लोषाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करतात पण या वर्षी काहीं आदिवासीं विरोधी घटना घडत आहे जसे मणिपूर मध्ये आदिवासीं महिलेंवर झालेली अमानवीय प्रवृत्ती ची घटना असो किंवा MP मध्ये झालेली नीच मानसिकतेची घटना त्यामुळे उमरदा गावातील सुजाण नागरिकांनी दरवर्षी प्रमाणे होणारें नाच गाण्याचे कार्यक्रम रद्द करून आदिवासीं विरोधी सरकार तसेच जातिवाद ला प्रोत्साहन करणाऱ्या उक्कल शुन्य लोकांबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला.
तसेच सर्व आदिवासीं लोकांनी संघटित होण्याचे आवाहन दिले. जय जोहर … जय आदिवासीं…
Leave a Reply