बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी.

बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी.

पिंपळनेर – येथील नवापूर व साक्री रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शासकीय वृक्षांची बेकायदेशीरपणे सर्रास कत्तल होत आहे, त्याबाबत पिंपळनेर  वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल यांना लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर पासून नवापूर रस्ता व साक्री रस्त्याच्या दुतर्फा पाच वर्षांपूर्वी भरपूर वृक्ष संपदा होती ,परंतु आपल्या कार्यालयाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी दहा ते पंधरा वृक्ष बेकायदेशीरपणे तोडली जात आहेत .रस्त्याच्या दुतर्फा असलेली शासकीय झाडे केमिकल अथवा अन्य मार्गाने सुकवली जातात व शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तोडली जातात. 

सदर वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही, त्यामुळे वृक्ष तोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सदर बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत म्हणून दि. 19- 5- 2021 रोजी लेखी निवेदन आपल्या कार्यालयात देण्यात आले होते ,परंतु त्याची योग्य ती दखल घेतली गेली नाही. 

यावरून कदाचित सदर वृक्षतोडीत आपल्या कार्यालयाची मिलीभगत असण्याची दाट शक्यता वाटते, सदर प्रकरणात आपण त्वरित कारवाई न केल्यास कर्तव्यात कसूर केल्यामुळे ,दप्तर दिरंगाई कायदा 2006 व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी आपल्या वरिष्ठांकडे करावी लागेल असे निवेदनात म्हटले आहे. 

सदर निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे पदाधिकारी श्री. प्रविण थोरात, श्री. प्रशांत कापडणीस श्री. लक्ष्मीकांत अहिराव हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !