चांदीचे भाव कमी झाले.
बुधवारी भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 615 रुपयांनी घसरून 55,095 रुपयांवर आला. चांदीचा भाव 2,285 रुपयांनी घसरून 62,025 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातील सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. शेवटच्या व्यवहारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव रु.55,710 वर संपला. आंतरराष्ट्रीय बाजारात एक औंस सोन्याची किंमत 1814 डॉलर आणि चांदीच्या औंसची किंमत 20.05 डॉलर होती.
पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले
अलीकडे खूप वाढलेल्या सोन्याच्या किमती हळूहळू कमी होत आहेत. आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 100 रुपयांनी कमी होऊन 50,900 रुपयांवर आला आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 100 रुपयांनी कमी होऊन 55,300 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा भावही 100 रुपयांनी घसरून 64,700 रुपये प्रति किलो झाला आहे. राज्यानुसार किमतीत थोडाफार बदल होणार.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता.
गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा थोडा धक्का बसला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 150 रुपयांनी वाढून 51,600 रुपयांवर पोहोचला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 170 रुपयांनी वाढून 56,290 रुपयांवर आहे. तर प्रतिकिलो चांदीचा भाव रु.1000 ते 70,200. कित्येक राज्यामध्ये सोने-चांदीच्या समान किंमती उपलब्ध असतील.
मोठी- बातमी !
पुढच्या महिन्यापासून हे सोने चालणार नाही
केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बदलानुसार, 1 एप्रिल 2023 पासून, सोने आणि त्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क केलेला सहा-अंकी अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे अनिवार्य आहे. हॉलमार्क नसेल तर ते सोने 1 एप्रिलपासून बाजारात विकताच येणार नाही. सरकारने जाहिर केले आहे की आता यापुढे फक्त 6 अंकी हॉलमार्क असलेले सोनेच वैध असेल.
Leave a Reply