रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या काय? आहे. जाणून घ्या.

रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या. 

रुग्ण आणि त्याच्या प्रतिनिधीला हॉस्पिटल /क्लिनिकल आस्थापनेच्या संदर्भात खालील अधिकार आहेत.

रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या. आपले अधिकार, हक्क आणि जबाबदाऱ्या काय? आहे. जाणून घ्या.

1. आजार, तपासण्या, काळजी, उपचार, परिणाम, अपेक्षित खर्चाची पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क असेल.

2. एचआयव्ही/एडस झालेल्या व्यक्तीस उपचार व देखभालीचा हक्क असेल.

3. रुग्णाला संबंधित हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात ठेवलेल्या तक्रार नोंद वहीत तक्रार लिहण्याचा अधिकार असेल.

4. डॉक्टरांची संपूर्ण माहिती (नाव, शिक्षण, नोंदणी क्रमांक व वैधता) दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

5. उपचार घेत असलेल्या डॉक्टरांव्यतिरिक्त दुसऱ्या डॉक्टरांचे मत (सेकंड ओपिनयन) घेण्याचा हक्क रुग्णाला असेल. यासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल रुग्णास अथवा त्याच्या प्रतिनिधीस उपलब्ध करून दिले जातील.

6. हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णाला व त्याच्या प्रतिनिधीला त्याचे वैद्यकीय रिपोर्ट आणि आंतररुग्ण कागदपत्रांची छायांकित प्रत मागणीनुसार उपलब्ध असेल. 7. रुग्णाला सुट्टी देताना सर्व रिपोर्ट, रोगनिदान, निष्कर्ष, दिलेले उपचार, रुग्णाची सद्य स्थिती व पुढील सल्ला यासहित डिस्चार्ज कार्ड दिले जाईल.

8. पुरवण्यात येणाऱ्या सेवा, विविध उपचार, त्यांचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर विस्तृतपणे दर्शवणारे दरपत्रक अथवा अनुसूची 3 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट दरांची यादी छापील स्वरूपात हॉस्पिटलच्या मुख्य दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल.

9. सर्व हॉस्पिटल्स रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने तातडीच्या जीवन रक्षणाच्या सेवा देतील. आणि त्यानंतर आजारांसंबंधी वैद्यकीय टिपण्णीसह लवकरात लवकर अशा रुग्णाला सोयीच्या नजिकच्या संदर्भ रुग्णालयात पाठवले जाईल.

10. हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यास आवश्यकतेनुसार न्यायवैद्यक प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्त केला जाईल. कुठल्याही परिस्थितीत रुग्णालयाचे देयक (बिल) भरले नाही म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव मृतदेह रोखून ठेवता येणार नाही.

11. शुल्क अदा केले नाही या कारणास्तव रुग्णाला हॉस्पिटल ताब्यात ठेवू शकणार नाही. 12. पुरुष डॉक्टरांकडून महिला रुग्णाची शारीरिक तपासणी करताना एका स्त्री कर्मचारी / नातेवाईकाने सोबत उपस्थित राहण्याचा हक्क.

13. केसपेपर, रुग्णांच्या नोंदी, तपासण्यांचे रिपोर्ट्स आणि तपशीलवार बिल (itemised bill) ची प्रत मिळणे

14. विशिष्ट तपासण्या, उपचाराबाबत रुग्णाला माहिती देऊन उपचारापूर्वी रुग्णाची संमती घेणे. 15. उपचारा दरम्यान रुग्णाची गोपनीयता, खाजगीपणा व मानवी प्रतिष्ठा जपली जाण्याचा हक्क.

16. पर्याय उपलब्ध असल्यास पर्यायी उपचार निवडण्याचा हक्क.

17. रुग्णाची एच. आय. व्ही. स्थिती किंवा इतर आरोग्य स्थिती, धर्म, वांशिकता, लिंग (ट्रान्सजेंडरसह ), वय, लैंगिक विविधता, भाषा, भौगोलिक / सामाजिक ओळख या आधारे रुग्णावर करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये कोणताही भेदभाव न करणे.

18. रुग्णाच्या वैद्यकीय नोंदींचे डिजिटाइझेशन करण्यापूर्वी रुग्णाची माहितीपूर्ण संमती घेणे.

19. रुग्णाला हॉस्पिटलमधील औषध दुकानातूनच औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नसणे. हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करू शकतात.

रुग्णांच्या जबाबदाऱ्या 

1. आरोग्याशी संबंधित सर्व माहिती देणे.

2. तपासणी आणि उपचारांदरम्यान डॉक्टरांना सहकार्य करणे.

3. सर्व सूचनांचे पालन करणे.

4. डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा मान ठेवणे, आदर करणे.

5. हॉस्पिटलमध्ये दाखल करतानारुग्ण किंवा नातेवाईक हमीपत्रावर सही करतात. त्यानुसार संबंधित हॉस्पिटल रुग्णावर उपचार करता. त्या उपचाराचे दरपत्रकानुसार आकारलेल्या बिलाची प्रतिपूर्ती करण्याची जबाबदारी संबंधित रुग्ण व त्याचे नातेवाईक यांची राहिल.

6. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे आरोग्यसेवा देणारे आणि डॉक्टर यांच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाहीत. तसेच रुग्ण व त्याचे नातेवाईक हॉस्पिटलच्या स्वच्छता व सुरक्षाविषयक नियमांचे पालन करतील.

संदर्भ-

1. रुग्ण हक्क क्र. 1 ते 11 हे सुधारित महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम, २०२१ (महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, १४ जानेवारी २०२१) कलम 11 क्यू, 11 जे (1), 11 एल आणि 11 एम मधील आहेत.

2. रुग्ण हक्क क्र. 12 ते 18 हे आरोग्यसेवा आयुक्तालय, महाराष्ट्र सार्वजनिक विभागाचे १५ नोव्हेंबर, २०२१ परिपत्रक याप्रमाणे आहेत.

3. रुग्ण हक्क क्र. 19 हे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जा. क्र. औ. वि/रुग्णालय/166-22/15 दि. 09.12 2022 याप्रमाणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !