करदात्यांचा पैसा जेवणावळींवर उडवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोणी दिला?
वर्षा बंगल्यातील जेवणावर तब्बल दोन कोटी ३८ लाखांचा वायफळ खर्च
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या त्यांच्या समर्थकांसाठी जेवणावळी उठत आहेत. शिंदे यांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते, समर्थक, नेते यांचा वर्षावर राबता असतो. या सगळ्यांच्या जेवणावर तीन महिन्यात तब्बल दोन कोटी ३८ लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे. तर चहापान आणि नाष्ट्याचा खर्च लाखात गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराद्वारे या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.
पण हे ५० खोके नाहीत, करदात्यांचा पैसा आहे, जो वायफळ खर्चात मुख्यमंत्री घालवत आहेत. महाराष्ट्रातील इमाने इतबारे टॅक्स भरणाऱ्या जनतेचा पैसा आपल्या राजकीय समर्थकांच्या जेवणावर उडवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोणी दिला? यापेक्षा जनतेच्या हिताच्या योजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद करावी अशी अपेक्षा राज्याला आहे.
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
Leave a Reply