महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून प्रत्येक गावात ग्रामपंचायत कडून संविधान भवन बांधण्यासाठी प्रस्ताव काढण्यात आला आहे. तरी गावातील प्रत्येक व्यक्तिंनी स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये या बाबतीत चौकशी करावी आणि संविधान भवन कुठे बांधायचे आहे. कश्या पद्धतीने बांधायचे आहे या बाबतीत ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी यांच्या कडे नेऊन घ्यायचा आहे. Construction of Constitution Building :
प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभाग कडून बांधण्यात येणार आहे.कोणालाही एक रुपये कुठे खर्च करण्याची गरज नाही सर्व प्रकिया शासनाची आहे जी ग्रामपंचायत मधून घेण्यात येणार आहे. प्रत्येक गावात संविधान भवन बांधणे बंधनकारक आहे.
तरी याला कोणाचा विरोध जरी असला तरी तो काहीच करू शकत नाही ही सर्व प्रक्रिया ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन कडे जाणार आहे यात कोणीच मध्यस्थी नाही किंवा कोणी कुठे दलाली करणार नाही आहे.
संविधान भवन बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वपूर्ण बाबी. Construction of Constitution Building
- ग्रामपंचायत च्या मासिक सभेत ठराव घेणे
- मासिक सभा ठराव विषय:- सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत —— मध्ये संविधान भवन बांधून मिळणे बाबत.
- संविधान भवन बांधण्यासाठी गावातील बौद्ध लोकांची लोकसंख्या प्रमाणपत्र ( 2011 च्या जनगणना नुसार )
- संविधान भवन बांधण्या साठी ग्रामपंचायत कडून निर्धारित केलेली बौद्ध समाजासाठी राखीव जागा चे प्रमाणपत्र
- संविधान भवन बांधल्यानंतर पदवी धर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण पात्र बौद्ध समाजातील व्यक्तींची व महिलांची संविधान भवन देखभाल व विनियोग समिती स्थापन करने.
संविधान भवन देखभाल व विनियोग समिती स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत च्या ग्राम सभा मध्ये ठराव होणे बंधनकारक आहे त्यानुसार समिती स्थापन होईल.
समिती स्थापन करतांना अटी शर्ती. Construction of Constitution Building
- (१) संविधान भवन देखभाल व विनियोग समितीचे अध्यक्ष चे बौद्ध जातीचे उच्च शिक्षित व्यक्ती / महिला असेल
- (२) संविधान भवन देखभाल व विनियोग समिती मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य तसेच संविधान भवनात जे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे जसे ग्रंथालय, Data entry, साफसफाई, वीज पुरवठा, आणि इतर या नुसार लोकांची नेमणूक करावी.
- (३) महत्त्वाचे संविधान भवन देखभाल समितीचे व्यक्ती हे पूर्ण बौद्ध समाजातील व्यक्तीच असले पाहिजे आणि ते उच्चशिक्षित असणे बंधनकारक आहे.
- (४) संविधान भवन बांधण्यासाठी संविधान भवन जिथे बांधण्यात येणार आहे त्या जागेचा नकाशा जोडावा
- (५) संविधान भवन बांधण्यासाठी संविधान भवन जिथे बांधण्यात येणार आहे त्या जागेचा नमुना 8 अ उतारा ग्रामपंचायत मधून ग्रामविकास अधिकरी ज्यांना सचिव तसेच ग्रामसेवक म्हणतात त्यांच्या सहीने प्रमाणित करून घ्यावा वणी प्रस्तावाला जोडावा.
- (६) संपूर्ण प्रस्तावावर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य आणि संविधान भवन देखभाल समिती च्या अश्यक्ष आणि इतर व्यक्तींची सही घेणे बंधनकारक आहे.
प्रस्तावाची एक प्रत गावातील सुजाण नागरिकांनी स्वतः कडे ठेवावा हे स्वतः साठी प्रूफ म्हणून योग्य असेल. Construction of Constitution Building
प्रस्तावाची प्रत्येकी 4 प्रत काढयच्या आहे त्यातील एक प्रत ग्रामपंचायत मध्ये ठेवावी आणि एक प्रत वर ग्रामपंचायत कडून सही शिक्का घेऊन OC ती प्रत स्वतःकडे ठेवावी म्हणजे पुढे जाऊन त्याची चौकशी करता येईल , इतर दोन प्रत गट विकास अधिकारी पंचायत समीती मध्ये घेऊन जावे आणि गट विकास अधिकारी कडून गट विकास अधिकारी च्या सहीने दोन्ही प्रत प्रमाणित कडुन एक गट विकास अधिकारी कडे द्यायची दुसरी स्वतः कडे OC म्हणून ठेवायची
अश्या दोन प्रत OC म्हणून तुमच्याकडे राहील ग्रामपंचायत ची OC आणि गट विकास अधिकारी ची OC समोर हेच कागदपत्रे तुम्हाला Proof म्हणून कामी येईल.
सर्व प्रकिया साधी सोपी आहे माझ्या कडे संविधान भवन प्रस्ताव ची प्रत आहे. जो ग्रामपंचायत कडून ठराव घेऊन गट विकास अधिकारी यांच्या कडे द्यायचा आहे. कोनाला हवा असेल तर मिळून जाईल.
वरील कोणतीही प्रोसेस ज तुम्हाला समजली नसेल तर मला massage करा मी ग्रामपंचायत ऑपरेटर आहे.
तुम्हाला सर्व माहिती आणि ठराव देतो. Construction of Constitution Building
प्रत्येक गावात संविधान भवन होणे सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने बंधनकारक आहे तरी ग्रामपंचायत कडून तुम्हाला हे काम करून घ्यावे लागेल.
- ग्रामपंचायत ऑपरेटर आहे तुम्हाला या बाबतीत सर्व मदत करेल.
- खाली संविधान भवन प्रस्तावाची फोटो पोस्ट करत आहे.
- कुठे जर समजले नसेल तर कॉल करा मला आणि पोस्ट जास्तीत share करा.
- कॉल करण्याआधी मला व्हाट्सअप्प करा ग्रामपंचायत आणि तहसील चे कामकाज असल्याने मी कॉल उचलला नाही तर व्हाट्सअप्प massage करावा.
- ग्रामपंचायत ऑपरेटर. Kunal Pathade
- कुणाल पथाडे.वणी तालुका यवतमाळ जिल्हा
- 9637946425 जय भीम नमो बुद्धाय
Related Informational Post :
- MAHA e Gram Citizen Portal Apps वर ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळेल.
- ग्रामसेवक ची संपूर्ण माहिती मराठीत. | Gram Sevak Information In Marathi
- Gram Rojgar Sevak : ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदारी
- ग्रामपंचायत ग्रामसभा संबंधित माहिती. | Gram panchayat Gramsabha In Marathi
- Construction of Constitution Building
Leave a Reply