मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय : Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana
कोणत्याही महिलेने घाबरून जायचं कारण नाही फॉर्म भरण्याची 31 ऑगस्ट ची मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2024 करण्यात आलेली आहे तसेच ज्या महिलांना अद्याप पर्यंत हप्ता पडलेला नाही त्यांना एकत्रित तीन महिन्याचा हप्ता पडणार आहे.
फॉर्म चेक करायचं काम चालू आहे चुकीचं झालेला असेल तर ते पण दुरुस्तीसाठी वापस फॉर्म येणार आहेत तरी सर्वांनी याकडे लक्ष देऊन राहावे काहीही अपडेट असतील तर ग्रुपला वेळोवेळी कळवले जातील लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांची सूचना…. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अद्यावत माहिती
मुंबई, दि.२: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.
योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. 30 सप्टेंबर अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.
Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana Apply Link Click Here
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Important Links :
Related Notification Information Pdf : Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana Online Apply | Click Here |
Official Website Information Link : Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana Online Apply | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Leave a Reply