पेसा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न.
शिरपूर: तालुक्यातील सांगवी येथे ग्रामविकास विभाग राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा यांच्या संयुक्त विद्यमाने पेसा क्षेत्रातील २६ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामकोष समिती अध्यक्ष, पेसा मोबिलायझर यांच्या करीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षण सत्रात सांगवी गटाचे जि. प. सदस्य योगेश बादल, सांगवीचे सरपंच कनीलाल पावरा यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तदनंतर दुर्गा गावीत यांनी रूढी, परंपरा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पेसा कायद्याचा अनुसूचित क्षेत्रातील गावांना लाभ व्हावा याकरीता पेसाची निर्मिती झाली असल्याची निर्मिती कांबळे यांनी दिली. |
पेसा प्रशिक्षणकरीता खालील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा समावेश
नटवाडे, लौकी, सुळे, हिगाव, आंबे, खैरखुटी, खामखेडा प्र.आं., खंबाळे, चिलारे, जामण्यापाडा, जोयदा, टेंभेपाडा, पळासनेर, पनाखेड, भोईटी, महादेव दोंदवाडा, मोहिदा, रोहिणी, लाकड्या हनुमान, शेमल्या, सांगवी, हाडाखेड, हातेड, हिवरखेडा, हेदऱ्यापाडा, हिसाळे
यांची उपस्थिती
जिल्हा पेसा समन्वय सचिन गायकवाड, प्रा. अतुल महाजन, विस्तार अधिकारी एस.एस. पवार, आर.जी. पावरा, पेसा तालुका समन्वयक सपना निकम, प्रशिक्षक दुर्गा गावीत, सरपंच कनिलाल पावरा, जि.प. सदस्य योगेश बादल, प्रा. मनोहर कांबळे, २६ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, पेसा मोबिलायझर, कोष समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्रशिक्षक सागर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी आर.जी. पावरा यांनी केले.
Leave a Reply