रेशीम शेती तुतीची लागवड करा अन् चार लाखांचे अनुदान मिळवा. रोहयोंतर्गत मिळणार अनुदान; विशेष अभियानातून जनजागृती. तुतीची लागवड चार लाख अनुदान देणारी योजने बद्दल माहिती जाणून घ्या. आणि आजच online फोर्म भरून घ्या. ( Tuti Lagawad Yojana In Marathi )
तुतीची लागवड योजना संबंधित माहिती : Tuti Lagawad Yojana In Marathi
कोणाबाद्द्ल लेख आहे . | तुतीची लागवड योजना : Tuti Lagawad Yojana In Marathi |
कोणी लांच केले ? | महाराष्ट्र सरकारने |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे शेतकरी |
साल | 2024 |
उद्देश्य | तुतीची लागवड योजनाची महत्वपूर्ण माहिती देणे. |
अधिकृत वेबसाइट | लिंक |
रेशीम शेती व उद्योग : वाढीसाठी जिल्ह्यात महारेशीम नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून, यंदा रेशीम शेती पाच हजार एकरापर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
रोहयोंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना : Tuti Lagawad Yojana In Marathi
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास दोन लाख १८ हजार रुपये तर संगोपन गृह बांधकामासाठी एक लाख ७९ हजार रुपये असे तीन वर्षांसाठी जवळपास तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान मिळणार आहे.
Related Scheme Post :
- Write A Book And Get A Grant / पहिले पुस्तक लिहा अन् अनुदान मिळवा
- कांदा चाळ अनुदान योजना 2024 आजच ऑनलाईन अर्ज करा.
- वैरण विकास योजना १०० टक्के अनुदान आजच या योजनेचा लाभ घ्या.
तुतीची लागवड साठी नोंदणी : Tuti Lagawad Yojana In Marathi
तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जात असून त्यांना अनुदानाविषयी माहिती दिली जात आहे. हे अभियान २० डिसेंबरपर्यंत राबविले जाणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकामासाठी असे तीन वर्षांसाठी तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
तुतीची लागवड साठी अनुदान : Tuti Lagawad Yojana In Marathi
या योजनेतून ३ वर्षांसाठी ३ लक्ष ९७ हजार ३३५ रुपये मजुरी व साहित्यासाठी दिले जातात. अल्पभूधारक नसलेल्या मात्र रेशीम विकास योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना सिल्क समग्र-२ या योजनेत सहभागी होता येईल.
२० डिसेंबरपर्यंत मुदत अभियान : Tuti Lagawad Yojana In Marathi
महारेशीम अभियानदरम्यान रेशीम उद्योग योजना राबविण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी २० डिसेंबरची मुदत असणार आहे. या कालावधीत संबंधितांना रेशीम उद्योगासाठी नोंदणी करता येईल.
काय आहे महारेशीम अभियान? : Tuti Lagawad Yojana In Marathi
- महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार
- रेशीम शेती व त्या आधारित पूरक उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- त्यानुसार शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
- या महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत रेशीम रथ तयार करून गावोगावी रेशीम शेतीबद्दल प्रचार- प्रसिद्धी केली जात आहे.
तुतीची लागवड साठी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे. : Tuti Lagawad Yojana In Marathi
- १) आधार कार्ड .
- २) मतदान कार्ड .
- ३) रहिवासी दाखला.
- ४) राशन कार्ड .
- ५) उत्नाचा दाखला.
- ६) पसपोर्ट फोटो.
- ७) शाळा सोडल्याचा दाखला.
- ८) लाभ न घेतल्याचा स्वयंघोषणा पत्र.
- ९) जॉब कार्ड.
- १०) अनुसूचित जाती / जमाती असल्यास ( जातीचा दाखला )
Related Scheme Post :
- Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana In Marathi
- जवाहर रोजगार योजना संपूर्ण माहिती : Jawahar Rozgar Yojana In Marathi
- कमी भाव, शेतमाल विकायचा कशाला? | Best Shetmal Taran Karj Yojana
कशासाठी किती अनुदान? : Tuti Lagawad Yojana In Marathi
या योजनेतून तुती लागवड 1) एक एकरासाठी ४५ हजार रुपये, 2) ठिबक सिंचनासाठी ४५ हजार रुपये प्रति एकर, 3) संगोपन गृहासाठी (६० बाय २५ फूट) २ लक्ष ४३ हजार, 4) संगोपन साहित्यासाठी ३७हजार= ५००रुपये, 5)निर्जंतुकीकरण साहित्यासाठी ३ हजार ७५० रुपये दिले जातात.
नोंदणीसाठी निकष :
अल्पभूधारक शेतकरी असावा, जॉबकार्डधारक, तसेच सिंचनाची सोय असावी. एका गावात पाच लाभार्थी मिळावेत. ग्रामपंचायत ठराव, कृती आराखड्यात समावेश असणे आवश्यक आहे. सातबारा, आठ अ, चतुःसीमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे आदी कागदपत्रांसह अर्ज करावा लागणार आहे.
सध्या या योजना आहेत चालू :
- PM Kisan Samman Nidhi Yojana
- गाय गोठा अनुदान योजना
- शरद पवार ग्राम समृद्धी कुकुट पालन शेड अनुदान योजना
Important Links
- You Tube Channel Link
- WhatsApp Channel Link
- Instagram Channel Link
- Facebook Page Channel Link
Leave a Reply