Gramin Batmya

weather today Live

News

शेवगांव शहरातील मारवाड गल्लीट भर वस्तीत भीषण दरोडा,दोघांचा जागीच मृत्यू.

शेवगांव शहरातील मारवाड गल्लीत भर वस्तीत भीषण दरोडा, बलदवा परिवारातील दोघांचा जागीच मृत्यू.

शेवगाव प्रतिनिधी – ता 23/06/2023,यां बाबत सविस्तर वृत्त असे की येथील बालाजी मंदिर समोर भर वस्तीत वास्तव्यास असलेल्या र बलदवा कुटुंबीयांवर पहाटे तीन ते चार वाजणेचे सुमारास दरोडा पडला. त्यामध्ये किंमती ऐवज तर लंपास झालाच, पण बलदवा परिवारातील दोन सदस्यांना देखील त्या नराधमांनी जिवे मारले.

अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाताई श्रीकिसन बलदवा व चुलते गोपीकिसन उर्फ दगडूशेठ गंगाबिसन बलदवा यांना दरोडेखोरांनी जागीच जीवे मारले. या दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून शेवगावकर हळहळ व्यक्त करत आहेत. 

तर गौरेश च्या काकूंना त्या दरोडेखोरांनी वीट फेकून मारल्यामुळे त्यांच्या डोक्याला देखील टाके पडले असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले या घटनेने शेवगाव सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनास्थळी अहमदनगर चे पोलीस अधीक्षक राकेश ओला डी.वाय.एस.पी. सुनील पाटील यांच्या नेतृत्व खाली भा.प्र.से. नवनियुक्त आय. पी. एस. प्रकाश sरेड्डी पी आय शेवगांव विलास पुजारी पुढील तपास करत आहे. 

*ताजा कलम*

गेल्या महिन्यात शेवगांव शहरात दंगल झाल्यापासुन अशा विचित्र घटना घडायला लागल्या आहेत शेवगांव शहर शांततेसाठी प्रशुद्ध होतें परंतु गेल्या काही दिवसांपासुन शहराचे वातावरण खराब झाल्याब सर्वसामान्य शेवगांवकर आणि व्यापारी धास्तावले आहेत 

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !