10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न. World Human Rights Day

World Human Rights Day : 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न. संपूर्ण माहिती वाचा .

10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न. World Human Rights Day

World Human Rights Day  : जागतिक मानवाधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न: अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्यसमन्वयक आदरणीय श्री. कांतीलालजी जैन साहेब यांच्या आदेशाने दि. 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवाधिकार दिन कन्या विद्यालय सामोडे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्साहात कोण कोण होते उपस्थित? World Human Rights Day

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आदरणीय  भाऊसाहेब श्री. शरद दादा शिंदे खजिनदार सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनिल काका शिंदे संचालक शेतकरी सहकारी संघ व कन्या विद्यालय सामोडे येथील मुख्याध्यापिका सौ. मनीषा ताई हंसराजजी शिंदे,माजी सरपंच श्री. विश्वास नाना शिंदे, श्री. प्रभाकर घरटे, श्री.हंसराजजी शिंदे,पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री.शेळके साहेब पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.जोशीसाहेब इत्यादी उपस्थित होते.

हा उत्साह कार्यक्रम कोठे झाला? : World Human Rights Day

कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

आपल्या भाषणात ते म्हणाले नैसर्गिक न्याय तत्त्वातून मानवी हक्कांची निर्मिती झाली,आपले हक्क व अधिकार हे मुलभुत आहेत ते कोणीही हिरावुन घेऊ शकत नाही. तर प्रमुख पाहुणे सौ. मनीषाताई शिंदे आपल्या भाषणात म्हणाल्या मानवी हक्क हे मूलभूत व नैसर्गिक हक्क आहेत व ते मानवाच्या विकासासाठी आवश्यक असे हक्क आहेत.

जागतिक मानवाधिकार दिन चे भाषण कोणी केले? World Human Rights Day :

प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा व स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आपल्याला आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. आदरणीय श्री. शरद दादा शिंदे,श्री. अनिल काका शिंदे, मनिषाताई शिंदे व श्री. प्रविण थोरात यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलिला सुरुवात झाली. सामोडे गावात मानवता जागृती रॅलीच्या माध्यमातून मानवी हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली, रॅलीच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्कीट वाटप करण्यात आले.

जागतिक मानवाधिकार दिन च्या सूत्रसंचालन कोण होते? World Human Rights Day 

या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन श्री. कुणाल बेनुस्कर  तर आभार प्रदर्शन श्री. संजय देसाई यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. प्रविण थोरात, श्री. हंसराजजी शिंदे,श्री. रोहिदास सावळे,श्री. रावसाहेब शिंदे, श्री, अरुण गांगुर्डे, श्री. भरत बागुल, श्री.चंद्रकांत अहिरराव,  श्री. किरण शिनकर, श्री.राजेंद्र एखंडे,श्री. मुकुंद खैरनार,श्री, सोमनाथ बागुल, श्री. दिनेश भालेराव, श्री.ज्ञानेश शिंदे,श्री. निशांत पाटील, श्री. हेमंत पाटील,श्री. राजेंद्र भदाणे तसेच सामोडे येथील कन्या विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जय दया सार्वजनिक वाचनालय, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता. How to scrutinize documents for Sarpanch and Member Election Post?

Related Notification Information :  Click Here
Official Website Information  Click Here
Information Government Scheme  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !