आजपर्यंत निवडणुकीत २५ हजार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त : Deposits of 25000 candidates seized in elections till date:

आजपर्यंत निवडणुकीत २५ हजार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त : Deposits of 25000 candidates seized in elections till date:

Deposits of 25000 candidates seized in elections till date : । राज्यात १९६२ पासून २०१९च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तब्बल २५,२०९ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरिता २८८ मतदारसंघासाठी ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाले, परंतु आज सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार अर्ज मागे घेणार यानंतर विधानसभा निवडणुकीत किती उमेदवार असणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

गेल्या १३ विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण ३३५६४ उमेदवारांनी आहे. यातील २५२०९ रक्कम जप्त झाली आहे, आपली अनामत रक्कम यश आले आहे. पाहिले तर एकूण ७५ निवडणूक लढवली उमेदारांची अनामत तर ४६७१ जणांना वाचवण्यात टक्केवारीनुसार उमेदवारांपैकी टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यातील १४ टक्के उमेदवार असे होते की, जे निवडून गेले नाहीत, पण अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले, तर ११ टक्के उमेदवारांना आपली अनामत रक्कम परत मिळाली आहे.

अनामत रक्कम जप्त होणे म्हणजे काय ?

दरम्यान, उमेदवाराला विधानसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल करताना अनामत रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी प्रत्येकी १२,५०० रुपये, तर इतरांसाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम असते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा निकाल समोर येतात तेव्हा एकूण वैध मतदानाच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते ज्या उमेदवाराला मिळतात, त्याची अनामत रक्कम जप्त होते आणि त्यापेक्षा जास्त मते घेतलेल्यांची अनामत रक्कम वाचते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एकूण २ लाख वैध मते असतील, तर अनामत रक्कम वाचण्यासाठी उमेदवाराला किमान ३३,३३२ मते मिळणे आवश्यक असते.

१९९५ मध्ये सर्वाधिक अनामत रक्कम जप्त Deposits of 25000 candidates seized in elections till date:

१९९५ मध्ये ४७२७ उमेदवारांपैकी ४०५९ जणांचे अनामत रक्कम जप्त झाली होती, तर ३८० जणांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले होते. यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर २०१४ मध्ये ४४०७ उमेदवारांपैकी ३७१३ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती, तर ४०६ जणांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले होते. तिसऱ्या क्रमांकावर १९९० मध्ये ३७६४ उमेदवारांपैकी ३०८९ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती, तर ३८७ जणांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले होते. चौथ्या क्रमांकावर २००९ मध्ये ३५५९ उमेदवारांपैकी २८८६ जणांची अनामत रक्कम जप्त झाली, तर ३८५ जणांना अनामत रक्कम वाचवण्यात यश आले. पाचव्या क्रमांकावर २०१९मध्ये ३२३८ उमेदवारांपैकी २६०७ जणांची अनामत रक्कम जप्त झाली, तर ३४३ जणांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले.

हेही वाचा : 

  1. Deposits of 25000 candidates seized in elections till date:
  2. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी द्यावी
  3. Deposits of 25000 candidates seized in elections till date:
  4. CSC Registration Online 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !