स्वाभिमानीचे पक्षाचे आंदोलन एक रकमी एफआरपी चा कायदा रद्द करण्यासाठी मापात पाप करणाऱ्या कारखान्या साठी दत्ता फुंदे स्वा. शेतकरी संघटना.
सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून गोरगरीब शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव मिळण्यासाठी आणि वजन काट्यात पारदर्शकता येण्यासाठी उसाला जास्त दर मिळण्यासाठी दि, 17 व 18 नोव्हेंबर रोजी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक तोडणी बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा द्यावा पुणे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर
महत्वाचे परिपत्रक…
खाजगी वजन काटे आणि साखर कारखान्यांचे वजन काटे हे दोन्ही वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित असतात. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी खाजगी वजन काट्यावरील उसाचे वजन ग्राह्य धरणे अपेक्षित आहे, परंतु तसे होताना दिसत नाही त्या संधर्भात एक परी पत्रक परिपत्रक राज्याचे कर्तव्यदक्ष साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहे.
एक रकमी एफआरपी चा कायदा रद्द करण्यासाठी स्वाभिमानीचे पक्षाचे आंदोलन.
या एका परिपत्रकामुळे साखर कारखानदार संदर्भातली एक महत्त्वाची तक्रार दूर व्हायला मदत होईल. खाजगी वजन काट्यावर आणि साखर कारखाने यांच्या कडील कडील वजन काट्यावर केलेल्या उसाचे वजन यात तफावत येते अशी भावना सर्व शेतकऱ्यांची आहे.
जर अशी तफावत आली तर त्याची तक्रार जिल्हा वैधमापन शास्त्र कार्यालयाकडे करावी. असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे
*जर कोणी खाजगी वजन काट्यावर वजन केले अशा शेतकऱ्याला सहकारी अथवा खासगी कारखानदार अथवा त्यांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत धमकावले तर त्याची रीतसर तक्रार प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडे करावी असे शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.
या एका परिपत्रकामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात असलेली साखर कारखानदारांकडून वजन काट्या मध्ये तफावत करून आपली फसवणूक केली जाते ही भावना दूर व्हायला मदत होईल.
तरी साखर कारखान्यांनी वजन काटा केल्यानंतर अडवल्यास,, बऱ्याच कारखान्यात *शेतकऱ्याचा ऊस मोजत असताना वजन नोंद घेणाऱ्या अधिकाऱ्याकडे जाण्याची परवानगी नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे दत्तात्रय फुंदे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगांव यांनी केले आहे.
स्वाभिमानीचे पक्षाचे आंदोलन |
*ताजा कलम.
सर्व साखर कारखान्यांनी आधी त्यांच्या कार्य क्षेत्रातील उसाचे गळप करावे मग बाहेरील गेटकेन ऊस आणावा जेणेकरून वाहतुक खर्चात कपात होऊन कारखान्याच्या सभासदांना H. N. T. { हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस } चा त्रास होणार नाही मोबदला जास्त मिळेल गाळप हंगाम संपत आल्यावर शेतकऱ्यांना मुकदम आणि ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्यांच्या पाया पडायची वेळ येणार नाही*
*( क्रमशः )*
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*
Leave a Reply