न्याय मिळवून दिल्याने समाधान माहिती अधिकारात अनेकांवर झाली कारवाई. दहावी शिकलेले राहुल मुळे यांनी कायद्याचा अभ्यास करून शेकडो जणांना न्याय मिळवून दिला.
कळंब : शिक्षण दहावी पास, पुढे शिकता आले नाही. दहा वर्ष कार्यालासमोर बसून कायद्याची पुस्तके विकली. फावल्या वेळ भरपूर पुस्तकाचे वाचन केले. कायद्याचा अभ्यास केला आणि माहिती अधिकारचा अभ्यास करून राहुल मुळे यांनी शेकड़ी नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.
शासकीय कामकाज आणि मुक्त समाज राखण्यासाठी शासन व्यवस्थेत पारदर्शकता महत्त्वाची आहे. शासन अनेक कारणांसाठी अस्तित्वात आहे. मुख्य लोकांची सेवा करण्यासाठी. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून करदात्या नागरिकांचे पैसे कसे खर्च केले जातात.
याची माहिती प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध करून देणे हे अधिकाऱ्यांचे शासकीय कर्तव्य आहे. दहा महिने प्रलंबित असलेली फेरफार नोंद, माहिती अधिकार अर्ज टाकताच दहा दिवसात मंजूर करण्यात येते. फळं येथील किसन खानार यांनी अडीच गुंठे जागा खरेदी केली होती.
परंतु तत्कालीन तलाठी यांच्याकडून खरेदीखत अधारे नींद लिखत सातबारा पत्रकात करताना अडीच गुंडेऐवजी एकटा एवढ्याच क्षेत्राची नोंद झाली होती. ही चूक खानोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालय येथे जमीन महसूल संहिताप्रमाणे चूक दुरुस्तीसाठी अर्ज दाखल केला.
या प्रकरणी तलाठी यांना अहवाल पाठवण्यास सांगीतले. तलाठी यांनी चूक दुरुस्ती करणे योग्य असल्याचा अहवाल तहसील कडे पाहता परंतु अहवाल प्राप्त झालेला असतानाही तहसील कार्यालयाने जवळपास आठ महिने त्या अहवालावर कोणतीही कार्यवाही न करता प्रकरण तसेच प्रलंबित ठेवले होते.
खाना यांनी मुळे संपर्क साधून हे प्रकरण सांगितले. मुनी तहसील कार्यालय यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज दाखल करून खानार यांच्या अर्जावर झालेल्या दैनंदिन कार्यालय निर्णयाची माहिती मागीतली माहिती अर्जाच्यादुसऱ्याच दिवशी तहसीलदार यांनी आदेश काढून फेरफार नोंद करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करून संकेतस्थळावर प्रसिद्ध केलो.
यावरून हे स्पष्ट झाले की, महिने प्रति असलेली फेरफार नद माहिती अधिकार अर्ज टाकताच १० दिवसात मंजूर झाली. माहिती अधिकाराची खरी ताकद काय आहे हे या प्रकरणावरून शासकीय अधिकान्यांच्या लक्षात आले. संबंधित अधिकारी हे प्रकरण कायमस्वरूपी आठवणीत ठेवतील, तसेच हे प्रकरण माहिती अधिकारावर काम करताना ऊर्जा देव राहील, अशी प्रतिक्रिया मुळे यांनी दिली. मुळे यांनी राज्यात अनेक ठिकाणी शेकडो माहिती अधिकार अर्ज दाखल केले.
नामध्ये बऱ्याच कामाचा निपटारा झाला आहे. आयुक्त, राज्य माहिती आयोग, खंडपीठ संभाजीगनर ३० ते ३५ अपील प्रलंबित असून यातील अनेक अपील बोगस फेरफार संबंधित असल्याची माहिती मुळे यांनी दिली. समाजसेवक अण्णा हजारे यांनी दि जन लोकपाल विधेयकासाठी केलेल्या आंदोलनातून प्रेरणा मिळाली असल्याचे मुळे यांनी सांगितले.
Leave a Reply