महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांचा आज राज्यव्यापी कामबंद आंदोलन.!
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांचा आज राज्यव्यापी कामबंद आंदोलन.! |
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांचा आज १६ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन त्याअनुषंगाने धुळे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी संघटना धुळे जिल्हा ह्यांचा आज धुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांनी आपल्या हक्काच्या विविध मागण्यांसाठी कामावर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
कोरोना महामारीच्या काळात आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांची यथायोग्य आरोग्याची काळजी घेणारे व कोविड सेंटर येथे विनावेतन आपले कर्तव्य पार पाडणारे तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड लसीकरण पूर्ण करण्यास महत्वाचा वाटा असणारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात आपले कर्तव्य बजावणारे दहा हजाराच्या घरात असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांनी आपल्या अनेक मागण्या शासनदरबारी लाऊन धरल्या होत्या पण कोणतेही शासन ह्या मागण्या पूर्ण करण्यास सकारात्मकता दाखवत नसल्याने समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य ह्यांनी आज १६ जानेवारी रोजी एकदिवसीय कामबंद आंदोलन हे हत्यार पुढं केलं आहे.
त्याचबरोबर ह्या मागण्या येत्या २३ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास मुंबई येथील आजाद मैदान येथे मोठे बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन उभारण्यात येईल अशी घोषणा संघटनेतील पदाधिकारी ह्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांनी त्यांच्या हक्काचे उपरोक्त विषय मागणीसाठी घेतले आहे.
१) शासनसेवेत कायम करणेबाबत व गट “ब” चा दर्जा देणेबाबत.
२) केंद्र शासन च्या मार्गदर्शक सूचनेनुसार ४०००० रुपये रकमेवर मानधनवाढ व अनुभव बोनस मिळणेबाबत.
३) मूळ वेतनाच्या १०टक्के कामावर आधारित मोबदला करणेबाबत.
४) जिल्हाबाह्य व जिल्हाअंतर्गत बदली करणेबाबत.
५) शासनाने निर्गमित केलेले HARD AREA ALLOWANCE हे शासनाने निर्गमित केलेल्या उपकेंद्र मिळणेबाबत त्यानुसार शासनाने निर्गमित केलेले धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याप्रमाणे शिरपूर तालुक्यातील अति दुर्गम भागातील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांना अतिदुर्गम भाग अतिरिक्त कामावर आधारित मोबदला देण्याबाबत.
६) केंद्र शासनाच्या सूचनेनुसार इंडिकेटर लागू करणेबाबत व २३ इंडिकेटर रद्द करणेबाबत अथवा प्रती इंडिकेटर १००० रुपये करणेबाबत.
७) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बढती मिळणेबाबत.
८) TA-DA, भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळणेबाबत.
वरील आपल्या हक्काच्या मागणींसाठी आज दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी धुळे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य सलग्नित एकदिवसीय कामबंद आंदोलन व जिल्हा परिषद धुळे येथे आवारात एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.
असे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी संघटना धुळे जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश मोरे, राज्यव्यवस्थापक डॉ.हिरा पावरा, राज्यसूचक डॉ.राहुल जाधव, जिल्हासमन्वयक डॉ.प्राची चौरे, धुळे जिल्हा खजिनदार डॉ.योगेश पाटील, सचिव डॉ.विनोद क्षीरसागर व धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांतील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांनी दिले आहे.
Leave a Reply