माहिती अधिकार अधिनियम 2005 नागरिकांना अवलोकन यासाठी अभिलेख उपलब्ध करून देणे बाबत शासन निर्णय.
बऱ्याच जणांना माहीत नसेल,आपण कोणत्याही शासकीय कार्यालये मध्ये जाऊन आपल्या कामासंबधित कागतपत्रे तपासू शकतो.शासकीय कामात अधिक पारदर्शकता येण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हास्तरीय कार्यालयापासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात.
महानगरपालिका, नगरपरिषद,जिल्हा परिषद ई. सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्या नंतरच्या कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे.आपले काम अडले असेल तर संबधित कागदपत्रे तपासण्याचे अधिकार सामान्य नागरिकांना आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
माहिती अधिकार अधिनियम 2005 नागरिकांना अवलोकन यासाठी अभिलेख उपलब्ध करून देणे बाबत शासन निर्णय. |
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत.
प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जाची संख्या कमी होणार या दृष्टीने कामकाजात पारदर्शकता होण्यासाठी. यात काही जिल्हास्तरीय कार्यालयापासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात नागरिकांना अवलोकन साठी अभिलेख उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक नुसार.
शासकीय कामकाजात आर्थिक पारदर्शकता येण्यासाठी व माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत प्राप्त माहितीही अर्जाची प्रथम व व्दितीय अधिक अपिलाची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्यातील जिल्हास्तरीय कार्यालयापासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात तसेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार त्यांच्या मागणीनुसार अभिलेख लोकांना साठी उपलब्ध करून द्यावेत.
असा हा शासन निर्णय असून प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्तीसह नागरिकांना अभिलेख अवलोकन यासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयोगाची आपापल्या कार्यालयात अंमलबजावणी करावी असा हा शासन निर्णय आहे.
शासकीय कार्यालये मध्ये जाऊन आपल्या कामासंबधित कागतपत्रे तपासू शकतो |
Leave a Reply