सात कर्मचाऱ्यांचा पगार असून हि सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘झेडपी’चा दणका.
आई – वडिलांना सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘झेडपी’चा दणका. |
ग्रामीण बातम्या लातूर प्रतिनिधी : दि. १० आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांच्या खात्यातील ३० टक्के पगार त्यांच्या आई- वडिलांच्या खात्यावर वर्ग होत असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.
जिल्हा स्थायी समितीची बैठक केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, संगीता घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण गिरी उपस्थित होते. यावेळी १४ विभागांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना
जिल्हा परिषदेच्या केंद्रे यांनी केल्या.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी गतीने काम करून जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली.
जे अधिकारी कर्मचारी – आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांचे ३० टक्के वेतन कपात करण्यात येईल, ही रक्कम आई-वडिलांना देण्यात येईल, असे जाहीर केले होते. १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांनी तक्रारी केल्या होत्या. त्यातील ७ जणांच्या पगारातून ३० टक्के कपात करून ती आई- वडिलांना देण्यात येत आहे. उर्वरित ५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती केंद्रे यांनी दिली.
Leave a Reply