विविध प्रकल्पाना कोट्यवधी रुपये देता, आदिवासीना खावटी का देत नाही, आमदार सुनिल भुसारांचा सभागृहात सवाल.
गप्पा मारत आहेत मात्र हा विकास फक्त कागदोपत्री दिसून येत असून कोट्यवधीचा निधी अखेर जातो कुठे असाही सवाल भुसारा यांनी यावेळी केला आजहि आदिवासी भागाचा विकास झालेला नाही रोजगाराच्या शोधात स्थलांतर आहेच मात्र शासन रस्ता वीज देताना त्याच्या उपजीविकेचा विचारही करणार आहे का नाही असा सवाल भुसारा यांनी केला आहे.
मोखाडा (प्रतिनीधी तेजस रोकडे): ): शेती केल्यानंतर पिक येई पर्यंत येथील आदिवासी बांधवांच्या हातात काम नसते प्रचंड पर्जन्यमान असल्यामुळे कोणतेही काम ते करू शकत नाही यामुळे अशा कालावधी साही महाविकास आघाडी सरकारने खावटी योजना चालु केली होती त्याद्वारे धान्य, डाळी, तेल अशा मोहाप्रमाणावर साहित्य आदिवासी बांधवांना देण्यात येत होते मात्र आताच्या सरकारने ते निधीचे कारण देत बंद केल्याचा आरोप आमदार सुनिल भुसारा यांनी केला आहे.
यामुळे विविध प्रकल्पाना कोट्यवधी रुपये शासन देते कित्येक धनदांडग्यांना कर्ज माफ दिल्ली जाती मात्र माझ्या आदिवासी बांधवाना खावटी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत काय असा सवाल आमदार भुसारा यांनी अधिवेशना दरम्यान सभागृहात केला आहे.
याच वेळी पाकिस्तानच्या कैदेत असलेले मच्छिमार सोडवण्यासाही सरकारने तातडीने पाउले उचलावीत, त्यासंबंधी पाहपुरावा करावा धरणे, शेततळे यासबंधी अनुदानाच्या फक्त घोषणा करण्यात येतात मात्र अमलबजावणी होत नाही मच्छिमार बांधवाचा डीझेल परतावा देण्यात यावा सरकार आदिवासीच्या विकासाच्या निव्वळ आहेत.
अन्नधान्याच्या शोधात अगोदर भटकंती व्हायची मात्र आजहि तुटपुजी शेतीसाठी आदिवासी बांधव गाव सोडुन डोंगर दरीत राहायला जावु लागला आहे. यामुळे आदिवासींच्या नावाने फक्त घोषणा नको तर शाश्वत विकास मायबाप सरकारने करावा अशी मागणी यावेळी केली. आदिवासीसाही खावटी योजना चालु व्हावी यासाड़ी भुसारा हे गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत.
Leave a Reply