ससून, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल वगळता अन्यत्र मिळेनात उपचार ‘आयुष्मान’बाबत जाहिरातींचा मारा; प्रत्यक्ष उपचार मात्र शून्य आयुष्मान कार्ड काढण्याचा मात्र धडाका सुरु ! उपचार मात्र महात्मा फुले योजनेतून सविस्तर बातमी वाचा .
आयुष्मान कार्ड काढण्याचा धडाका सुरु ! उपचार मात्र महात्मा फुले योजनेतून |
ग्रामीण बातम्या : प्रत्येकाला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्याची जाहिरात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढून देण्याचा धडाका सुरु आहे. दुसरीकडे या योजनेतून ससून आणि पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल दगळता इतर कोणत्याही शासकीय किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होत नाहीत, त्यामुळे या कार्डचा उपयोग सध्यातरी शून्य होत असल्याचा अनुभव रुग्ण आणि नातेवाइकांना येत आहे.
Related News : आयुष्मान आभा कार्ड काढा.
Ayushman Card Kase kadhave पूर्ण माहिती वाचा Link
महात्मा फुले जन आरोग्य योजना .
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनेक शस्त्रक्रिया होत नाहीत आणि पाच लाख रुपयांची मर्यादाही अजून लागू झाली नसल्याने दोन्ही आरोग्य योजनांचा नुसताच गवगवा केला जात असल्याचा अनुभव रुगणांना येत आहे.
कार्ड काढण्याचा मात्र धडाका!
आयुष्मान भारत योजनेतून उपचार मिळत नसले तरी याचे कार्ड काढण्याचा धडाका केंद्र आणि राज्य शासनाने लावला आहे. आरोग्य विभागासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडूनही हे कार्ड काडले जावे, यासाठी प्रचंड फॉलोअप सुरू आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनाही याचे प्रेशर आहे. दुसरीकडे या कार्डचा काही उपयोग होत नसल्याने रुग्णांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.
सर्वोपचार काय आहे योजना?
आयुष्मान भारत ही केंद्र शासनाने २०१८ रोजी सुरू केलेली पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देणारी योजना आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. परंतु, मोठ्या खासगी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही योजनाच नाही. ही योजना प्रामुख्याने शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथे आहे.
प्रमुख उपचार महात्मा फुले योजनेतूनच
- • वास्तविक पाहता अंगीकृत रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजना देशात २०१८ मध्ये लागू झाली, राज्यात दीड लाखापर्यंत मोफत उपचार देणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना (राजीव गांधी जन आरोग्य योजना। २०१४ पासूनच सुरू होती.
- • त्याअंतर्गत अपघात, अजिओप्लास्टी, बायपास, अस्थिरोग, मेंदूविकार यासह साडेसातशे प्रकारचे उपचार होत होते. म्हणून आयुष्मान भारत योजना आल्यावर २०१८ पासून या योजनेची महाराष्ट्रात कशी अंमलबजावणी करायची याचा पेच होता.
- • म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्र केली आहे. परंतु, प्रमुख उपचार महात्मा फुले योजनेतूनच होत आहेत.
दिलासा मिळण्यापेक्षा डोकेदुखीच जास्त
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळतील अशी अपेक्षा अनेकांना आहे, प्रत्यक्षात मात्र ज्यांच्यावर याचा लाभ घेण्याची वेळ आली, त्यांना दिलासा मिळण्यापेक्षा डोकेदुखीच जास्त सहन करावी लागल्याचे चित्र आहे. पॅकेज वाढवणे गरजेचे परतावा मिळेना म्हणून टाळाटाळ महात्मा फुले जनआरोग्य योजना ही पुण्यातील सरकारी, खासगी मिळून ६९ रुग्णालयांत आहे. आयुष्मान भारत योजना ससून, जिल्हा रुग्णालय, कैटोन्मेंट रुग्णालय आणि काही उपजिल्हा रुग्णालयांतच आहे. ज्यांनी यात उपचार घेतले त्या हॉस्पिटल्सना शासनाकडून परतावाही मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेतून उपचार देण्यास रुग्णालयेही टाळत आहेत.
समस्या काय
- • या योजनेस पात्र असलेल्या रुग्णाला सुरुवातीला थेट या योजनेतून उपचार केले जात नाही.
- • आधी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार फेले जातात आणि योजनेचा दीड लाखाचा निधी संपला तर आणि आयुष्मान भारत या योजनेत घेऊन उपचार केले जातात.
- • तुरळक प्रकारच्या पेशंटना याची गरज पडते. म्हणून आयुष्मान भारत ही योजना पांढरा हत्ती ठरत आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना २०१४ मध्ये सुरू झाली. त्यावेळी या अंतर्गत खासगी रुग्णालयांना शस्त्रक्रिया किवा प्रक्रिया करण्यासाठी जे पॅकेज होते ते आज ९ वर्षानंतरही कायम आहे. त्यामुळे ते पॅकेज खासगी रुग्णालयांना परवडत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालये या योजनेत येण्यास उत्सुक नसतात. त्यासाठी पॅफैज वाढवणे गरजेचे आहे.
2 thoughts on “आयुष्मान कार्ड काढण्याचा धडाका सुरु ! उपचार मात्र महात्मा फुले योजनेतून”