खूप खर्च झाला; हजार रुपये द्या उपनिरीक्षकाने मागितली लाच.
Rural News : बेपत्ता असलेल्या महिलेच्या शोधासाठी खूप खर्च झाला. त्यामुळे मोबाइल परत हवा असल्यास एक हजार रुपये लाच द्या, अशी मागणी करणारा सहायक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
यावेळी त्यांच्या मित्रासोबत एक महिन्यात ‘खाकी’वर चवथा ‘डाग’
• गेल्या महिनाभरात जिल्हा पोलिस दलातील चार जणांना लाचलुचपत विभागाने पकडले आहे. त्यामुळे खाकी डागाळली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काही ठाण्यातील शुक्राचार्याची झाडाझडती घेतली होती, अशी माहिती आहे.
तक्रारदार हे मित्राच्या वाहनावर चालक म्हणून होते. तीन महिन्यांपूर्वी ते गाडी घेऊन भोकर येथे गेले होते. महिलाही होती. त्यानंतर ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल झाली.
या प्रकरणाचा तपास विमानतळचे सपोउपनि अशोक रामराव कुरुळेकर यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर कुरुळेकर यांनी तक्रादाराला चौकशीसाठी बोलाविले. तसेच मोबाइल आणि आधार कार्ड काढून घेतले.
त्यात काही दिवसांनंतर ती महिला मिळून आली. त्यामुळे तक्रारदार हे परत ठाण्यात गेले. यावेळी त्यांनी कुरुळेकर यांच्याकडे मोबाइल आणि आधार कार्ड परत देण्याची विनंती केली.
तीन महिन्यांपासून तक्रादार त्यासाठी चकरा मारत होते. त्यावर कुरुळेकर यांनी बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी खूप खर्च झाला आहे. एक हजार रुपये द्या अन् मोबाइल, आधार कार्ड घेऊन जा, असे सांगितले.
याबाबत लाचलुचपत.
विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून पंचासमक्ष सपोउपनि कुरुळेकर यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर कुरुळेकर याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Leave a Reply