एस.टि. स्टॅण्ड हरवले आहे!!!! कोणाला सापडले तर. |
शेवगाव शहरातील बसस्थानक एस.टि. स्टॅण्ड हरवले आहे!!!!
कोणाला सापडले तर शेवगांवच्या आमदार किंवा खासदार साहेबांकडे जमा करा योग्य बक्षीस दिले जाईल!
गेली चार वर्षे रखडलेले बांधकाम भर पावसात महिला मुलं अबाल वृद्ध यांची होणारी कुचंबणा बसायला जागा नाही डोक्यावर शेड नाही बस पार्किंग साठी जागा नाही शौचालयाची दुरावस्था घाणीचे साम्राज्य अश्या समस्यांच्या विळख्यात असलेले बस स्थानक डेपो म्यनेजर कायम गायब रात्रीची लाईट नाही जागोजागी साचलेले उकांडे उघड्यावरील मुताऱ्या डासांचे साम्राज्य जबाबदार कोण?
डिसेंबर 2018 पासुन सुरु असलेले भ्या दिव्य बांधकाम ठेकेदाराचे रखडलेले बिल *तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष शेवगांवचे डेपो म्यानेजर श्री वासुदेव देवराज सांभाळतात दोन दोन पद त्यांचे त्यांचं नगर शेवगाव सुरु असत बांधकामाचे ठेकेदार श्री बाळासाहेब मुरदारे म्हणतात एसटीच्या अधिकाऱ्यांनी एक छदामहि दिला नाही प्रवासी संघटना नुसतीच नावाला आहे परंतु शालेय विद्यार्थी माता भगिनी अबालवृद्ध यांचे होणारे आतोनात हाल याला जबाबदार कोण?
ताजा कलम.
एस.टी. आगाराची अवस्था तर याहून वाईट आहे पतरीसरातील गचपण डुकरांचा मुक्त संचार डासांचे साम्राज्य आगारात कामं करणारे कार्मचारी कायम आजारी पडतात पण तोंड दाबुन बुक्क्याचा मार सांगता येईना सहन हि होईना*
*क्रमशः अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार*