ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना अटक का होत नाही?

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना अटक का होत नाही? २७ लाख ५० हजारांची रक्कम रोखण्यात सायबर पोलिसांना यश.

नाशिक : शहर सायबर ठाण्यातील पोलिसांकडे गेल्या चार महिन्यांत सुमारे १६ तक्रारी दाखल झाल्या असून, या सर्वच प्रकरणांत सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यांतील विविध प्रकरणांमधील जवळपास २७ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम सायबर भामट्यांच्या हाताला लागण्यापासून वाचविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी ही रक्कम संबंधित खात्यांमध्ये गोठवली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम संबंधित खातेधारकांना मिळू शकणार असल्याचे पोलिस सांगतात. मात्र सायवर पोलिस विविध गुन्ह्यांमधील आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नसल्याचे चित्र दिसून येते. ठाण्यात.

महिलांसंबंधी छळाचे, विनयभंगाचे गुन्हे असल्याचे असे सायबर भामटे पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. मात्र आर्थिक फसवणूक आणि लूट करणारे चोरटे त्यांची मूळ ओळख लपवून गुन्हे करीत असल्याने त्यांना अटक करणे अवघड जात असल्याचे पोलिस सांगतात.

सायबर पोलिसांत चार महिन्यांत १६ तक्रारी

नाशिक सायबर पोलिस ठाण्यात १६ तक्रारी दाखल झाल्या असून, या प्रकरणात पोलिसांनी सायबर भामट्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.

२७ लाख ५० हजार रुपये रोखले

गेल्या चार महिन्यांत सुमारे १५ ते १६ तक्रारी दाखल झाल्या असून, या सर्वच प्रकरणांत सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सायबर लॅबमध्ये सातजणांचा स्टाफ

नाशिक सायबर पोलिस ठाण्यासाठी कार्यरत सायबर लॅपसाठी मनुष्यबळ आवश्यकतेप्रमाणे असले तरी सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना लॅबचाच कार्यभार पाहावा लागतो, त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र अधिकाऱ्याची गरज आहे.

केवळ १५ गुन्हे दाखल

नाशिक सायबर पोलिस ठाण्यात दोन लाखांहून मोठ्या रकमेच्या ऑनलाइन फसवणुकीसंदर्भात तसेच अन्य इंटरनेट मोबाइल,

अॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाया प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होत असून अशा प्रकारे। १६ गुन्हे मागील चार महिन्यात दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : घरात चोरी झाल्यास तक्रार अर्ज कसा लिहावा.

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार केवायसी अपडेट, ईमेलद्वारे, लोन अॅप, लॉटरी, ओएलएक्सवरून खरेदी-विक्री, बनावट पेमेंट लिक, क्यूआर कोड, अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल करून खंडणीसाठी धमकावणे,

सायबर पोलिस ठाण्यात १७ जणांची फौज

■ नाशिक शहरातील सायबर गुन्ह्यांची व्याप्ती बघता सायबर पोलिस ठाण्यात अतिशय अपुरे मनुष्यबळ आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक स्तरावरील अधिकारी करतात.

■ मात्र नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात एकच पोलिस निरीक्षक व एक पोलिस उपनिरीक्षक आहे. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षकांवर व अन्य सहकान्यांना तपासाची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याचे दिसून येते.

आरोपीला अटक नाही.

विविध सायबर गुन्ह्यांमधील आरोपी हाताला लागत नसल्याचे चित्र दिसून येते. महिलांसंबंधी छळाचे, विनयभंगाचे गुन्हे असल्याचे असे भामटे पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. चोरटे त्यांची मूळ ओळख लपवून गुन्हे करीत असल्याने त्यांना अटक करणे अवघड असल्याचे पोलिस सांगतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !