कंत्राटी महिला अभियंत्याच्या घरात कोट्यवधींचे घबाड ३० लाखांचा टीव्ही, ५० कुत्री, १० कार; पगार ३० हजार.
पोलीस गृहनिर्माण महामंडळात नियुक्त सहायक अभियंता (कंत्राटी) हेमा मीना यांच्या फार्महाऊसवर लोकायुक्त पोलिसांनी छापा घातला. हेमा यांना दरमहा ३० हजार रुपये वेतन आहे आणि त्यांच्याकडे सापडलेल्या एका टीव्हीचीच किंमत ३० लाख रुपये आहे. २० हजार स्क्वेअर फुटांच्या आलिशान बंगल्यात राहाणाऱ्या हेमाच्या संपत्तीचे मूल्यांकन शुक्रवारीही सुरू होते. हेमा यांनी १३ वर्षांच्या नोकरीत उत्पन्नापेक्षा २३२ टक्क्यांनी अधिक संपत्ती गोळा केली. वेतनानुसार हेमा यांची संपत्ती १८ लाख रुपये असायला हवी. फार्महाऊसमधील खास खोलीतून महागडी दारू, सिगारेट आदीही जप्त करण्यात आले आहे.
• हेमा यांचा ४० खोल्यांचा बंगला दीड कोटीचा आहे. ५० वर परदेशी जातीची कुत्री त्यांच्या फार्म हाऊसमध्ये आहेत. त्यांची किंमत लाखांत आहे. ६०-७० विविध जातींच्या गायीही आहेत. १२ वर नोकर हेमा यांच्या हाताखाली आहेत. त्यांच्याशी हेमा वॉकीटॉकीवरून बोलतात. १० लक्झरी कार आहेत. २ ट्रक, १ टैंकर आहे. या मालमत्तेची किंमत ७ कोटी असावी.
११ कोटीचा आलिशान बंगला, ७ लक्झरी कारही
३० हजार पगार, सरकारी कर्मचाऱ्याकडे ७ कोटींचे घबाड
भोपाळ मध्य प्रदेश येथील सरकारी कर्मचान्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. ३६ वर्षीय हेमा मीना यांचा पगार महिन्याकाठी केवळ ३० हजार रुपये असताना त्यांच्याकडे २० वाहने, ७ लक्झरी कार, २० हजार चौरस फूट जमीन, अतिशय महाग असलेल्या गीर जातीच्या १२ गाई, ३० लाख रुपये किमतीचा ९८ इंची टीव्ही यासह इतर अनेक गोष्टी आढळल्या आहेत. भ्रष्टाचारविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात सरकारी अधिकाऱ्याने कमावलेली बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे.
मध्य प्रदेश पोलिस गृहनिर्माण महामंडळामध्ये कंत्राटी प्रभारी सहायक
अभियंता असलेल्या हेमा मीना यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या अवघ्या १० वर्षांत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले.
मीना यांच्या घरावर पथकाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती उघडकीस आली. यामध्ये १०० कुत्रे, संपूर्ण वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम, मोबाइल जॅमर यासह इतर मौल्यवान वस्तूंचा समावेशही आहे. पथक गुरुवारी सौर पॅनल दुरुस्तीच्या नावाखाली मीना यांच्या बंगल्यात आले, पथकाने एका दिवसात तब्बल ७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता शोधून काढली आहे. ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा तब्बल २३२ टक्के जास्त आहे.
शोधमोहीम आणखी काही दिवस चालणार लोकायुक्ताचे पोलिस अधीक्षक मनू व्यास यांनी सांगितले की, बिलखिरिया येथील मीना यांच्या निवासस्थानासह तीन ठिकाणी शोधमोहीम घेण्यात आली. त्यांच्याकडे ५ ते ७ कोटी रुपयांची मालमत्ता असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरु असून, यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. याप्रकरणी मीना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात
३६ वर्षीय हेमा मीना आला आहे, असे ते म्हणाले. अनेक ठिकाणी जमिनी
मीना यांनी प्रथम वडिलांच्या नावावर २० हजार चौरस फूट शेतजमीन खरेदी केली. त्यानंतर सुमारे १ कोटी रुपये किमतीचे मोठे घर बांधले. आलिशान निवासस्थान, याव्यतिरिक्त रायसेन आणि विदिशा जिल्ह्यातही जमीन असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि इतर मशिनरीही आहेत.
असे लुबाडले…
प्राथमिक निष्कर्षानुसार मध्य प्रदेश पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या प्रकल्पांमध्ये वापरण्यासाठी असलेली सामग्री अभियंत्याने घर बांधण्यासाठी वापरली होती. याचवेळी कापणी यंत्रासह अवजड कृषी यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली आहे.
Leave a Reply