बस चे कंन्डक्टर यांचा मनमानी कारभार. |
शिरपूर बस कंन्डक्टर यांचा मनमानी कारभार
दिनांक 20/06/2022 रोजी रात्री सुटणारी पुणे शिरपूर बस चे कंन्डक्टर यांचा मनमानी कारभार प्रवासी ला तक्रार पुस्तक न दिल्याने त्यांचे विरुध्द शिरपूर आगार प्रमुख यांचे कडे दिली तक्रार
तक्रार दाराने तक्रार दिल्या प्रमाणे.
दिनांक 20/06/2022 रोजी पुणे ते शिरपूर रात्री 8:45 वाजता पुणे बस स्थानक येथुन सुटणारी बस नं MH 20 बी एल 1349 मध्ये मी शिरपूर येण्यासाठी प्रवास करत होतो.
तेव्हा मोबाईल ची बॅटरी कमी झाल्याने त्याला चार्ज करणे आवश्यक असल्याने व लांब पल्ल्याच्या बस मध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रीकल बोर्ड लावलेले असतात.जेणे करून प्रवासीला रात्री मोबाईल चार्ज करता येईल.
तरी त्या बोर्डात मी मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला असता ते बोर्ड मध्ये वीज कनेक्शन नसल्याने बोर्ड बंद होते मी कंन्डक्टर यांना त्याची विचारपूस केली असता त्यांनी बोर्ड बंद आहे. असे सांगितले तरी मी त्या संदर्भात तक्रार नोंद करण्यासाठी त्यांचे कडुन तक्रार पुस्तक मागीतले परंतु त्यांनी तक्रार पुस्तक देणे आवश्यक असतांना उर्मटपणे सांगितले कि पुस्तक माझे कडे नाही तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते डेपो मेनेजर ला जाऊन सांगा मला काहीच सांगु नका असे उडवाउडवीची उत्तरे दिली.
खरे तर प्रवासी ला चांगली वागणूक देणे त्यांचे कर्तव्य आहे व प्रत्येक बस कंन्डक्टर कडे बस मध्ये तक्रार पुस्तीका असणे बंधनकारक आहे परंतु त्यांनी आपला पदाचा दुरुपयोग करुन व आपली मनमानी करुन मानसिक त्रास दिला.
माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे. |
म्हणुन मी शिरपूर येथे आगार प्रमुख यांचे कडे त्यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व मला झालेल्या मानसिक त्रास मुळे पंधरा हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी यासाठी दिनांक 22/06/2022 रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे तरी मा आगार प्रमुख साहेब त्यांचे विरुध्द काय कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे.
तक्रार दार माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे.
( माहिती अधिकार कार्यकर्ता)