बाटलीबंद पाण्याची सक्ती कराल तर हॉटेलमालकांवर कारवाई बक्कळ नफा कमावण्यासाठी सक्ती करत असल्याचे प्रकार उघड
खबरदार हॉटेल चालकांनो बाटलीबंद पाण्याची सक्ती कराल तर. |
नवी मुंबई: हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर टेबलावर येणारे पाण्याचे जग, ग्लास आता बाजूला गेल्याचे दिसत आहे. त्या बदल्यात थेट बाटलीबंद पाणी ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. ग्राहकाला शुद्ध जेवण देण्याबरोबर शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी हॉटेलचालकाची असते. मात्र, बक्कळ नफ्यासाठी ही जबाबदारी हॉटेल व्यावसायिक टाळत आहेत. मात्र, असे केल्यास अन्न औषध विभागाच्या माध्यमातून कारवाई होऊ शकते.
Related News : Hotel Complaint Link
नवी मुंबई शहरात विविध टॅगलाइनखाली खाद्यालयांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे चोखंदळ खवय्यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी या नव्या खाद्यसंस्कृतीने केवळ नफ्यासाठी आपल्या ग्राहकांच्या तोंडचे हक्काचे पाणी मात्र पळवले असल्याचे समोर आले आहे. बाटलीबंद पाणी हा ग्राहकांचा ऐच्छिक विषय राहिला नसून हॉटेलचालकांनी लादल्याचे दिसून येत आहे.
ग्राहकाला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी सक्ती करण्याचे अधिकारी नाहीत
जुन्या पारंपरिक हॉटेलचालकांपेक्षा बहुतांश नवीन हॉटेलचालक आघाडीवर आहेत. टेबलावरील जग, ग्लास चाजूला झाले असून, थंड की साधी अशी विचारणा करून बाटलीबंद पाणी टेबलावर ठेवले जात आहे.
ग्राहकाला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी हॉटेलचालकाची असून, चाटलीबंद पाणी सक्त्तीचे अधिकार हॉटेल चालकाला नाहीत. ग्लासभर पाणी सहजपणे मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये आता प्रत्येक ग्राहकाला वाटलीचंद पाण्याची सक्ती केली जाते.
हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला शुद्ध जेवण देण्याबरोबर शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी हॉटेलचालकाची असून, बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही.
अन्न-औषध विभागाकडे तक्रार करू शकता याबाबत ग्राहक अन्न व औषध विभागाकडे अशा हॉटेलची तक्रार करू शकतात आणि संबंधित हॉटेलवर कारवाई देखील होऊ शकते. शहरात हजारो हॉटेल्स…तर एफडीएकडे करा तक्रार. हॉटेलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ आणि पाणी हे ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ मिळायलाच हवेत आणि हा ग्राहकाचा अधिकार असून बाटलीबंद पाण्यासाठी ग्राहकांना सकाळी करण्यात येत असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार करावी.
ग्राहकांनी जाब विचारणे आवश्यक बाटलीचंद पाणी हा ग्राहकांचा ऐच्छिक विषय आहे. बाटलीचंद पाण्याची सक्ती करणाऱ्या हॉटेलचालकांना ग्राहकांनीदेखील जाब विचारणे आवश्यक आहे.
नवी मुंबई शहरात हजारो विविध हॉटेल्स असून, या हॉटेल्समध्ये खवय्यांचीदेखील मोठी गर्दी असते. यामधील अनेक हॉटेल्सची नोंदणी केली असून, अनेक हॉटेल्स नोंदणीविना सुरू आहेत.