आपल्या शाळेतील गुरुजी आले की नाहीत? झटपट कळेल!
ग्रामीण बातम्या : महाराष्ट्रातील एक लाखांवर शाळांपैकी बहुतांश शाळा खेड्यापाड्यात, तर कित्येक शाळा अतिदुर्गम गावात आहेत. तेथील कारभारावर रोज नियंत्रण ठेवणे पर्यवेक्षकीय यंत्रणेला शक्य होत नाही, म्हणून आता प्रत्येक आहे. शाळेतील शिक्षकाची हजेरी दररोज मोबाइल अॅपवर नोंदविली जाणार आहे.
कोणते गुरुजी शाळेत आले आणि कोणी दांडी मारली, हे जिल्ह्याच्या ठिकाणापासून, तर राज्यस्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांना एका क्लिकवर कळणार आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने त्यासाठी विद्या समीक्षा केंद्राच्या मदतीने स्विफ्ट चॅट डेटा गोळा करणे सोपे.
राज्यातील शाळांवर देखरेख करण्यासाठी ही सिस्टीम तयार केली जात आहे. या अँपच्या माध्यमातून शाळांची जिल्हा, तालुका, केंद्रनिहाय माहिती एकाच वेळी एकत्र होणार आहे. विद्या समीक्षा केंद्राच्या पुणे मुख्यालयात हा डेटा गोळा होणार
मोबाइल अॅप विकसित केले आहे. या ॲपवर शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी मुख्याध्यापकांना लॉगीन करावे लागणार आहे. तर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी वर्गशिक्षकांना लॉगीन करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची रिअल टाइम’ हजेरी नोंदविली जाणार आहे.