शेवगांव शहराचे ग्रामदैवत श्री. खंडोबा देवस्थान आणि हजरत सोनामिया वली साहेब दर्गा यांच्या यात्रा उत्सवाच्या सिद्धिविनायक मंदीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून सुरवात.
ग्रामदैवत यात्रा उत्सवा निमित्त मंदीरात मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून सुरवात. |
अविनाश देशमुख शेवगाव.
शेवगांव शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. खंडोबा देवस्थान आणि हजरत सोनामियावली साहेब दर्गा यांच्या यात्रा उत्सवाच दोन वर्षांच्या खंडा नंतर भव्य आयोजन करण्याचा जुन्या आणि नव्या पंच मंडळाचा संकल्प शुक्रवार दिनांक 18 रोजी क्रांती चौकातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून ढोल ताशांच्या गजरात लोकवर्गणी चे पावती पुस्तकाची पूजा करून सुरवात.
सिद्धिविनायक मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात पंच मंडळ पायी चालत खंडोबा मंदिरापर्यंत पायी चालत ग्रामदैवतांची पूजा करून श्री. खंडोबा मंदीर येथे झालेल्या पंच मंडळाच्या बैठकीत येत्या 04 डिसेंबर रविवार रोजी खंडोबा देवाची यात्रा तर येत्या 25 डिसेंबर रोजी हजरत सोनामिया वली साहेब यांचा यात्रा उत्सव भरवण्याचे ठरले.
यावेळी खंडोबा यात्रौत्सव कमिटीचे प्रमुख इजाजभाई काझी ह. सोनामिया दर्गा यात्रौत्सव समितीचे प्रमुख म्हणुन सतीश लांडे पाटिल यांची घोषणा माजी उपनगराध्यक्ष वजीर भाई पठाण यांनी केली त्यास सर्व पंचानी एकमुखाने पाठिंबा दिला यां वेळी खजिनदार म्हणुन गणेश कोरडे आणि उमर भाई शेख यांची नियुक्ती केली.
यावेळी सर्व माजी नगरसेवक विविध पक्षांचे प्रमुख आजी माजी पंच आणि दोन्ही देवस्थानचे पुजारी उपस्थित होतें यां वेळी *खंडोबा देवस्थान चा 03 ता. शनिवार सायंकाळी छबिना मिरवणुक 04 रविवार कावड पाणी यात्राउत्सव 05 सोमवार ऑर्केष्ट्रा 06 मंगळवार जंगी हगामा असाच कार्यक्रम ह. सोनामिया दर्गा देवस्थान 24 शनिवार संदल मिरवणुक 25 रविवार मुख्य यात्रा उत्सव 26 सोमवार कव्वाली 27 मंगळवार जंगी हगामा असा भरगचच कार्यक्रम जाहीर करण्यात आला* यावेळी शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक प्रमुख पंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतें
ताजा कलम.
*दर वर्षी दोन्ही देवस्थान च्या यात्रा मध्ये पंधरा दिवसांचे अंतर असते पण अहमदनर येथे मुस्लिम समाजाचा इस्तेमा चा कर्यक्रम असल्यामुळे दोन्ही यंत्रामध्ये 21 दिवसांचे अंतर पडले आहे सुमारे दोन वर्षांच्या खंदा नंतर यातर भारत असल्याने बालगोपाळ आणि शेवगावकरांमद्ये उत्साहाचे वातावरण आहे.
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply