ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध दारु विक्रीचा अड्डा. |
पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे गावात जि प शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध दारु विक्रीचा अड्डा शाळेच्या बगीच्या मध्ये दारुच्या बाटल्यांचा खच प्रशासनाचे दुर्लक्ष विदयार्थी काय आदर्श घेणार?
ग्रामपंचायत मध्ये शाळेच्या मैदानात दारूच्या बाटल्या.
अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सोमठाणे येथील शाळेत जाण्या चा योग आला शिक्षक- विद्यार्थ्याचे प्रश्न समजून घेत असताना दबक्या आवाजात सरांनी शाळेच्या मैदानात दारूच्या बाटल्या आढळत असल्याचे सांगितले. शाळेच्या मैदानात फिरलो असता काही देशी दारूच्या बाटल्या सापडल्या.
ग्रामपंचायत मध्ये अवैध दारूचा धंदा
शाळेपासून, ग्रामपंचायत कार्यालयापासून आणि एका समाज मंदिरापासून फक्त १० मिटरच्या अंतरावर अवैध दारूचा धंदा चौकात चालतो. गावच्या पोलीस पाटलांचा तो दररोजचा रस्ता आहे, त्यांना याच्याशी काहीच देणे घेणे नाही.
ग्रामपंचायत मध्ये अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल केले.
महिन्याचा फुकटचा पगार येऊन पडतो तेवढ बास झालं. यासंदर्भात जानेवारी महिन्यात पाथर्डी पोलिसांकडे काही लोक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या वरच सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल केले. ज्याची कायदेशीर लढाई कोर्टात सुरू आहे.
ग्रामपंचायत मध्ये शांतता आणि सुव्यवस्थेची पोलीसपाटलांना माहित नाही.
सोमठाणे हे तसे पाथर्डी तालुक्याच्या सीमा भागातील गांव गावातल्या शेंबड्या पोराला माहितेय अवैध दारू चौकात विकली जाते पण शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेतलेल्या पगारी पोलीसपाटलांना माहित नाही.
ग्रामपंचायत मध्ये शाळेत मुलांचे काय भविष्य असेल?
ज्या शाळेच्या मैदानात मुलांना दारूच्या बाटल्या आढळून येत असतील त्या शाळेत मुलांचे काय भविष्य असेल? गावातल्या कितीतरी महिलांना स्वतःच्या व्यसनी मुलाकडून, पती कडून मारहाण सहन करावी लागते.
ग्रामपंचायत मध्ये घर आणि तरुण पिढ्या व्यसनात.
दुसऱ्यांची घर आणि तरुण पिढ्या व्यसनात बिघडवून स्वतःचे घर भरणारे समाजाचे नेतृत्व करतो असं मिरवत फिरतेत म्हणजे लांडग्यानी शेळीची राखण करण्यासारखे आहे. असं म्हणण्यासारखे आहे.
विशेष म्हणजे एकीकडे शाळेत दारूच्या बाटल्या सापडत असताना, दुसरीकडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दारू विकणाऱ्या भुरट्याना सोबत घेऊन ग्रामपंचायतीत कार्यक्रम करीत फिरत होते. गावाच्या दृष्टीने हि लज्जास्पद बाब आहे.
ताजा कलम.
ग्रामीण भागातील व्यसनाधीन होत असलेली पिढी त्यास प्रशासनाचि मुक सहमटि कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
अविनाश देशमुख शेवगाव.
सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार.
Leave a Reply