ग्रामपंचायत च्या विकास कामात भ्रष्टाचार, |
निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करा.अन्यथा पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येणार.
शेवगांव तालुक्यातील कऱ्हेटाकळी ग्रामपंचायत च्या विकास कामात मोठा भ्रष्टाचार ठेकेदार ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने लाटला माढ्याचा टाळूवरील निधी झालेल्या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे ग्रामस्थ.
जिल्हापरिषद अहमदनगर च्या मार्फत जनसुविधा यां योजनेत ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रोड रुपये 975000/- किमतीचा आणि समशानभुमी सुशोभीकरण रुपये 975000/- किमतीचि संरक्षक भिंत यां कामात संबंधित ठेकेदाराणे ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच याना हाताशी धरून थातुर मातुर कामं करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. यां संधर्भात कर्हेटाकळी येथील
ग्रामस्थ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी.
शेवगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी BDO श्री. महेश डोके यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज कार्यकर्ते श्री. सतीश गायके श्री लक्ष्मण गायके अविनाश पोटे संदीप कणसे सचिन म्हस्के पांडुरंग चितळे शंकर गटकळ गणेश काटे बाबासाहेब काटे यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या सहीनिशी पंचायतसमिती शेवगांवच्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत सादर बोगस कामाची चौकशी करून दोषींवर { बागडबिल्यांवर} कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती यां तक्रार अर्जात करण्यात आली आहे. अन्यथा शेवगांव पंचायत समिती कार्यलयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे असे अर्जात नमुद करण्यात आले आहे.
ताजा कलम.
जिल्हापरिषद अहमदनगर मधुन तालुक्यात कोट्यवधींची कामं झाली परंतु स्थानिक पातळीवर अभद्र फुल घड्याळ युती करून मील बाटके खायेंगे यां उक्ती प्रमाणे हपापा चा माळ गपापा करून टिरीला हात पुसणारे कोण ??? याची खमंग चर्चा पंचक्रोशीत सुरु आहे.
{ क्रमशः }
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply