अपहराच्या आरोपावरून पं. स. समोर आंदोलन.
प्रतिनिधी, शिरपूर : स्मार्ट तालुक्याची बिरूदावली मिरवणाऱ्या शिरपूर तालुक्यात भ्रष्टाचार सर्वोच्च असल्याची प्रचिती वेळोवेळी येते. काल दिनांक 10 जुलै पासून तालुक्यातील मालकातर, भोईटी, चाकडू येथील ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत पंचायत समिती शिरपूर समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. वरील ग्राम पंचायतीत करोंडोंचा भ्रष्टाचाराचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मालकातर, भोईटी व चाकडू येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांना आंदोलनाबाबत निवेदन देवून कालपासून (दिनांक 10 जुलै) प्रत्यक्ष आमरण उपोषणाला बसलेत. वरिल प्रत्येक ग्राम पंचायतीत कमी – अधीक प्रमाणात करोंडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान भोईटी येथील उपोषण कर्त्यांना चौकशी करण्याचे आश्वासन देवून उपोषण मागे घेण्याचे पत्र दिले.
तरी देखील उपोषणाला बसलेत. दरम्यान ग्राम पंचायतीचे विस्तार अधिकारी एस. एस. पवार यांची उपषोण कर्त्यांशी चर्चा चालु होती. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याचे बोलून दाखवले. उपोषणकर्ते भोंग्या पावरा भोईटी, नरेंद्र पावरा, नितीन पावरा मालकातर, विरसिंग पावरा, पिंटू मुखडे चाकडू