जन्म – मृत्यू नोंदणी कडे दुर्लक्ष. कराल तर चढा कोर्टाची पायरी.

जन्म - मृत्यू नोंदणी कडे दुर्लक्ष. कराल तर चढा कोर्टाची पायरी.
जन्म – मृत्यू नोंदणी कडे दुर्लक्ष. कराल तर चढा कोर्टाची पायरी.

पोर्टलवर होते ऑनलाईन नोंद जिथे जन्म किंवा मृत्यू तिथे नोंद बंधनकारक.

जिथे मृत्यू किंवा जन्म होतो त्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असच् त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे पण ही नोंद वेळेतच न झाल्यास संबंधित नातेवाईकास कोर्टाची पायरी चढावी लागते ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे सामान्य गरीब लोकांच्या खिशाला याचा खर्च परवडत नसल्याने चित्र आहे यामुळे नातेवाईकांनी सतर्क राहून जन्ममृत्युच्या नोंदी वेळेत होण्यासंबंधी पाठपुरावा करावा.

2016 पासून सी आर एस पोर्टल वर जन्म-मृत्यूची नोंदणी ऑनलाइन वर केली जात आहे ग्रामपंचायत हद्दीत मृत्यू जन्म झाल्यास ग्रामसेवक महानगरपालिकेच्या हद्दीत आरोग्य अधिकारी नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नोंद करतात अपघाती मृत्यू झाल्यास किंवा खून झाल्यास त्याचा मृत्यू दाखवली याची नोंद पोलिस प्रशासनाने घालणे गरजेचे आहे जन्म-मृत्यूची 21 दिवसाच्या आत नोंदणी प्राधिकृत अधिकारी मोफत करतात.

घरात प्रसुती झाल्यास.

घरात प्रसुती झाल्यास बाळाची नोंद घालण्याचे अधिकार आशा अंगणवाडी सेविकांना आहेत पण अशी प्रसुती झाल्यास या दोघांनाही समजल्यास जन्मनोंद वेळेत होत नाही वर्षानंतर पुन्हा कोर्टात जाऊन नोंदणीसाठी प्रक्रिया करावी लागते ही प्रक्रिया गरिबांच्या आर्थिक बुद्धी बाहेरची आहे त्यामुळे वेळेत नोंद करा.

 कोर्टात गेल्यास विलंब.

 1) ती नोंदणी एक वर्षावर पर्यंत न झाल्यास त्यानंतरची नोंद न्यायालयाच्या आदेशानंतरच घालावी लागते यासाठी पहिल्यांदा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत अर्ज करावा लागतो.

 2) अर्जाला उत्तर मिळाल्यानंतर ते घेऊन ग्रामीण मध्ये ग्रामसेवक शहरात मुख्याधिकारी महानगरपालिकेत आरोग्य अधिका-यांना न्यायालयात विरोधीपक्ष करावे लागते.

 3) न्यायालय साक्ष जबाब नोंदविल्यानंतर आदेश होतो त्या आधारे नोंद घातली जाते त्यासाठी कमीत कमी पुन्हा सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधी जाऊ शकतो पैसेही खर्च होतात. असे न होता नोंद वेळेतच करा.

डोकेदुखी टळेल.

21 ते 30 दिवसापर्यंत चांदीची अधिकार निबंध कहाणी 30 दिवस ते एक वर्षापर्यंत ग्रामीण भागात गट विकास अधिकारी शहरी मध्ये मुख्याधिकाऱ्यांना आहेत यासाठी लागणाऱ्या तिकिटाचे किरकोळ खर्च अर्जदाराच्या करावा लागतो काही अडचणी आल्या तरी एक वर्षाच्या आतच नोंद करून घेतल्यास नातेवाईकांची डोकेदुखी ठलू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !