जामण्यापाडा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात संपन्न.
शिरपूर: तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या जामण्यापाडा येथे ग्रामपंचायत कार्यालय, जि. प. मराठी शाळा व प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा मध्ये विश्व आदिवासी दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
हेही वाचा : विश्व् आदिवासी दिवस चा इतिहास वाचा.
यावेळी आदिवासी क्रांतीवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या चिमुकल्यांनी आदिवासी पेहराव परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक भुषण बच्छाव जि. प. मराठी शाळा यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेचे चंद्रकांत महाले यांनी जागतिक आदिवासी दिनाचा इतिहास सांगितला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी व नृत्य सादर करीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गेंद्या पावरा अध्यक्ष युवक काँग्रेस, विलास पावरा ग्रामपंचायत सदस्य, वेरसिंग पावरा, दिलीप पावरा, सोनू पावरा, रामेश्वर पावरा, ताराचंद पावरा, केनसिंग पावरा, पवन पावरा, सुरेश पावरा, आकाश पावरा, गितेश पावरा तसेच गावातील नागरीक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.