शिंदखेडा तालुक्यातील शिक्षकांच्या अपूर्ण संख्येच्या मुद्दयावर सुनीता सोनवणे यांचे आंदोलन. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप !
जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप |
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. जुने कोड येथील शिक्षक वेळेपूर्वीच निघून जातात. कुरुकवाडे येथील शाळेत मुख्याध्यापक वर्गात दारू पितात तरी प्रशासन कारवाई करीत नाही, चार वर्षांपासून शिंदखेडा सिंचन विहिरी मंजूर झाल्या नाहीत आदी कारणांवरून जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे व शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शुक्रवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाला कुलूप ठोकत दालनासमोरच ठिय्या मांडला.
सीईओच्या दालनाला कुलूप लावताना जि. प. सदस्या सुनीता सोनवणे, सोबत शानाभाऊ सोनवणे व विद्यार्थी अखेर जि.प. अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर तसेच सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे सीईओंनी आश्वासन दिल्यानंतर सोनवणे दाम्पत्याने शिंदखेडा अधिकाऱ्यांची धावपळ सीईओ आले अन दुसऱ्या आंदा तालुक्यातील समस्या दरवाजातून दालनात गेले.
सीईओंच्या दालनाचे कुलूप उघडण्यात आले. जुने कोडदे तसेच कुरूकवाडे येथील जि.प. शाळेतील स्थितीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्या अनुषंगानेच हे आंदोलन करण्यात आले.
सुनीता सोनवणे, शानाभाऊ सोनवणे यांच्यासह जि.प. शाळेतील विद्यार्थिनी, ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी ११ वाजता घोषणा देत जिल्हा परिषदेत पोहोचले. जिल्हा परिषद प्रशासन तालुक्यात शिक्षकांची नियुक्ती करीत नाही, सिंचन विहिरी मंजूर करीत नाही असे सांगत सदस्या सुनीता सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शुमभ गुप्ता यांच्या दालनाला कुलूप ठोकून त्याच ठिकाणी ठिय्या मांडला.
दालनाला कुलूप ठोकू, असा इशारा सोनवणे दाम्पत्याने यापूर्वीच दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. शुक्रवारी सुनीता सोनवणे यांनी सीईओंच्या दालनाला कुलूप ठोकले. सीईओंच्या दालनाला कुलूप ठोकताच अधिकाऱ्यांची धावपळ झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी सोनवणे दाम्पत्याची भेट घेत आंदोलन मागे घ्या, आपण दालनात चर्चा करून असे सांगितले. मात्र, त्यांचे कोणीच ऐकून घेतले नाही. शहर पोलिस दाखल या आंदोलनाची माहिती शहर पोलिस स्टेशनला मिळताच डीबी पथक तसेच पोलिस कर्मचारी जिल्हा थोड्या वेळाने सीईओ शुभम गुप्ता आपल्या दालनाजवळ आले, मात्र दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु असल्याचे दरवाजातून आपल्या दालनात प्रवेश ‘बघून त्यांनी दुसऱ्या केला.
सीईओंनी घेतली भेट अर्ध्या तासानंतर सीईओ गुप्ता हे सोनवणे दाम्पत्याला भेटायला आले. त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत, सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परिषदेत दाखल झाले. त्यांनी सोनवणे यांना कुलूप उघडण्यास सांगून येथून उठण्यास सांगितले. मात्र, आम्ही मागणी पूर्ण होईपर्यंत येऊन हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून
- शिंदखेडा तालुक्यातील शिक्षण, रस्ते, सिंचन विहिरी याबाबत सभागृहात अनेकदा प्रश्न मांडले. मात्र, प्रशासनाने ते सोडविले नाही. काही शाळांमध्ये शिक्षक दारु पिऊन येतात, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. -सुनीता सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या
- हेही वाचा : ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार नवीन कायदा : लिंक
- जे शिक्षक शाळेत थांबत नसतील, त्यांच्यावर कारवाई करू विद्यार्थ्यांसाठी जे जे आवश्यक आहे ते करणार. तसेच येत्या महिनाभरात शिंदखेडा तालुक्यात दोन हजार सिंचन विहिरी मंजूर केल्या जातील. -शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी
शिक्षकाने दुपारीच लावले शाळेला कुलूप, विद्यार्थी वाऱ्यावर! जुने कोडदे येथील प्रकार, कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी जुने कोडदे येथील शाळेचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन आज हे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा, उपाध्यक्षांची मध्यस्थी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हेदेखील आले. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा, आंदोलन मागे घ्या, असे आवाहन केले. त्या आवाहनाला सोनवणे दाम्पत्याने प्रतिसाद दिला आणि त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. पोलिस कर्मचायांने कुलूप उघडताच या आंदोलनावर पडदा पडला.
हेही वाचा : “बेमुदत संप” आंदोलना संदर्भात करावयाची कार्यवाही
शानाभाऊ सोनवणे यांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, पोलिस शानाभाऊंना उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बघून विद्यार्थी- विद्यार्थिनी काहीसे घाबरले होते.
Leave a Reply