डॉ. ACB च्या जाळ्यात | डॉक्टरला लाच स्वीकारताना अटक. डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
ग्रामीण बातम्या : अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ६० हजारांची लाच घेणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग उपचार विभागात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. डॉ. प्रणव शिरसाठ ( वय ४०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
डॉ. शिरसाठ यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. डॉ. शिरसाठ ससून
रुग्णालयातील अस्थिरोग व्यंग विभागात तज्ज्ञ आहेत. तक्रारदाराला अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे होते. प्रमाणपत्र देण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून त्यांनी ६० हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या पडताळणीनंतर लाचलुचपत विभागाने सापळा लावून डॉ. शिरसाठ यांना ६० हजारांची लाच घेताना पकडले. ससून रुग्णालयाच्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातून रुग्ण येतात. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ससून रुग्णालयात खळबळ उडाली आहे.
Leave a Reply