गाव तसं चांगलं पण समस्यांनी टांगलं… गावाला प्रगतीच्या शिखरावर नेणारी आणि गावाला उध्वस्त करणारी पंचायत म्हणजे ग्रामपंचायत होय. लोकं दारू पीऊन मटन खाऊन बटन दाबून लोकशाहीला बडी पडताय.. विकासाचं एक मॉडेल गाव घडवायचं असेल तर परिवर्तन वैचारिक विचारांचा उमेदवार निवडा आणि गाव विकास करणाऱ्या नागरिकांच्या बाजूने उभे रहा.आता गावाकडे ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.
ग्रामीण लोक म्हणतात की गावात आमचेच सरकार येणार, ग्रामपंचायत हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाऊ लागले आहे..शेकडो वर्षे शिक्षण आरोग्य भौतिक सुविधा दळणवळण यांच्यापासून कोसो दूर असलेल्या गावांना यामुळे विकासाची संधी उपलब्ध झाली. पंचायतराज व्यवस्थेत झालेल्या सुविधांमुळे गावांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देखील प्राप्त होऊ लागला.ग्रामपंचायतीना मिळणारा निधीचे मोठ्या प्रमाणात लिकेज होते.
दारू पीऊन मटन खाऊन बटन दाबनारांनो लोकशाहीला विकू नका.. |
ग्रामीण भागातील विकासाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतो.
टक्केवारी च्या जीवावर अनेक पुढारी गब्बर होतात. लोकांच्या कराचा राज्याचा निधी टक्केवारीद्वारे भ्रष्ट लोकांच्या खिशात जातो. खेड्यांचा विकास हे महात्मा गांधीजीनी पाहिलेले स्वप्न अजूनही स्वप्न राहिले आहे. निधीची तरतूद असूनही स्वातंत्र्यानंतर आजही अनेक गावात अजून वीज पोहोचलेली नाही.
प्रत्येक जिल्ह्यातील गावाची परिस्थिती.
प्रत्येक जिल्हात अशी काही गावे आहेत जिथे अजूनही रस्ते, नाली, नाहीत. हि परिस्थिती दुर्गम भागातील गावांमध्येच नाही.तर विकसित समजल्या जाणाऱ्या अनेक भागात हीच परिस्थिती आहे.राज्यात खराब रस्त्यामुळे अनेक गरोदर स्त्रीयांचा देखील मृत्यू झालेला आहे.
खरा दुर्गम महाराष्ट्र राज्याचा नकाशा.
दवाखान्यात पोहचू शकत नसलेले अनेक रुग्ण दगावलेले आहेत. देश चंद्रावर मंगळावर झेपावताना त्याच देशातील बाळंत स्त्रीला झोळीतून दवाखान्यात जावे लागते.त्या पाऊल वाटेवर पडणाऱ्या तिच्या रक्ताच्या उमटलेल्या रेषा हा खरा दुर्गम महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे.याला सरकार आणि प्रशासन जितके जबाबदार आहे. आणि निवडणुकीला स्वतःला लिलाव करणारे मतदार. मटन खाऊन बटन दाबणारे नागरिक किंवा नवयुवक जोपर्यंत आहेत तोपर्यंत खेड्यांचा विकास होणारच नाही..
सरपंच फक्त नावाचा.
मतदार बंधू-भगिनीनों, इथे एक गोष्ट आवर्जून नुमद करावीशी वाटते, सरपंचामध्ये कीतीही चांगले गुण असले तरीही त्याला गावकऱ्यांच्या सहभागा शिवाय काहीच करता येत नाही. आणि जर लोकांनी दुर्लक्षित केले तर सरपंच फक्त नावाचा बनून राहतो. आणि मग तो गावाच्या विकासापेक्षा तो स्वतःच्या आर्थिक विकासाकडे जास्त भर देतो.
लोकसहभाग महत्वाचा.
ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकसहभाग हा महत्वाचा ठरतो.. सरपंचने ठरवलं तर आपल्या छोट्याश्या गावाला नंदनवन बनवू शकतो. मात्र सर्वप्रथम त्याने तसे ‘ठरवणे’ महत्वाचे आहे. अर्थातच हे वाटतं तितकं सोप्पही नसतं. गावातील समाज, जात, वाडी, गावकी, भावकी आणि मानपान इत्यादी अनके कटकटी, अडचणी असतात.
या सर्वांवर मात करून, ग्रामोउन्नतीचा ध्यास ठेवून वाटचाल केली तर नक्कीच मार्ग सापडतो.सरपंच आपले अधिकार गाजवून तो गावासाठी खूप काही करू शकतो. राज्यात अशी अनेक नंदनवनं फुलली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पाटोदा गाव, हिवरे बाजार व राळेगणसिद्धी अश्या आदर्श गावांचा उल्लेख करता येईल. त्या गावातील सरपंचानी अनके प्रश्न, अडचणीना सामोरे जात आपल्या गावाचं नाव लोकांसमोर ‘आदर्श गाव’ म्हणून ठेवलं. अश्या सरपंचाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपापली गावे विकासपथावर नक्कीच आणता येतील..
लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही.
गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थानांतरित व्हावं लागतंय. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव.
गावातील शाळेकडे गावकऱ्यांचे दुरलक्ष करणे,प्रत्येक गावकरी शाळेला महत्त्व न देता, मंदिराला महत्त्व देतात.. गाव पुढाऱ्यांचे मुलं बाहेर गावी शिक्षण घेण्यासाठी पाटवतात त्यामुळे ते लोक गावातील शाळेकडे पाहत नाहीत, गरीबांच्या मुलांना शिक्षण चांगले मिळत नाही हे फक्त गावातील पुढाऱ्यांमुळे.. आपल्या गावचा सर्वांगणी विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, नाली, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, कित्येक काळापासून गावावर राज्य करण्याऱ्या गाव गावपुढारींने ते केले नाही किंवा त्यांना करता आले नाही..
गावातील बाहेर गावी राहणारे बंधू-भगिनीनों सावध रहा.
निसर्ग संधी प्रत्येकाला देतो,आता आपली पाळी आहे.. कोरोनामुळे आपण मुंबई, पुणे, औरंगाबाद व ईतर जिल्हामध्ये अडकलेले आपण पण गावातील कोणत्या पुढारी व नेत्यांनी विचारपूस केली का?तुम्हांला वाटले जर उमेदवार योग्य आहे तर तुमच्या पसंतीचा उमेदवाराला मतदान करा.नाही तर तो अमक्याचा मुलगा आहे त्यांला मत द्या,तो तमच्या नेत्यांंच्या मागेपुढे लुडबुड करतो त्यांला मत द्या.हे बंद करा आणि जो लायक उमेदवार आहे त्यांलाच मतदान करा.गावातील उमेदवार बघा,त्याचे विचार, आचार, सुशिक्षित व गावाचा विकास करु शकतो का उघड्या डोळ्यांनी बघा नीट.
कळवळा नसणारे लोक ‘आम्हीच गावाचा उद्धार करू’ म्हणून बोलू लागल्यावर.
गावाचे वेगवेगळे रंग, रूप या निवडणुकीतून बघायला मिळते. एकंदरीत गावाचं खरं दर्शन यातून होते.निवडणूक म्हणजे काय ? निवडणूक कशासाठी ? हेही बरोबर ठाऊक नसलेले लोक केवळ स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, वर्चस्व दाखवण्यासाठी काहीही करायला तयार होतात. दोन पार्ट्याचा गाव चार-पार्ट्यात बदलतो.कधीही गावाविषयी तळमळ आणि कळवळा नसणारे लोक ‘आम्हीच गावाचा उद्धार करू’ म्हणून बोलू लागतात. यात खरी गोची होते,गावासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या मुलाची कार्यकर्त्यांची.
गावातील प्रत्येक माणसांसाठी ‘सेवक’ म्हणून काम केल्यावर.
यादरम्यान गावासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर सारले जाते आणि राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी कधीही पुढे न आलेले लोक स्वतःचा झेंडा पुढेकरतात.निवडणूकीची प्रक्रिया खरेतर गावातील प्रत्येक माणसांसाठी ‘सेवक’ म्हणून काम करण्यासाठी आहे. मात्र ‘सेवक’ च्या ठिकाणी सगळे पुढारी होतात. आपल्याच रुबाबात वावरू लागतात. शासकीय योजनांची कुठलीही माहिती नसणारे लोक, कधीही कोणाच्या मदतीसाठी न धावून जाणारे लोक, कधीही गावाच्या हितासाठी एकत्र येऊन न काम करणारे लोक, काम करणाऱ्यांची टिंगल उडवणारे लोक, ऐन निवडणुकीच्या हंगामात स्वतःला ‘स्वयंघोषित नेते’ समजू लागतात.
निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली की एका घराचे दोन तुकडे तसे ठरलेले असतात. भाऊ-भाऊ आणि सासू-सुना एकमेकांशी बोलणे टाळू लागतात. सुरळीत सुरू असणारे घर शेजारच्या घरी संशयाने पाहू लागते. गावात दारू मटन आणि पैशांचा पूर येतो. गावाच्या विकासासाठी शाळेसाठी कधीही मोठी वर्गणी न देणारे लोक यात लाखो रुपयांची उधळण करतात. ‘रात्रीस खेळ चाले’ हे भयावह चित्र गावगाड्याला नेहमीच मारक ठरत आले आहे.
गावाच्या बाहेर बैठकी होतात. शेतात पार्टी होते, कधीही न विचारणारे लोक एकमेकांना ‘कसं काय चाललंय भाऊ’ म्हणून विचारू लागतात. केवळ सह्या मारण्यापूरते बरेच लोकप्रतिनिधी खुर्चीवर बसतात. ना त्यांना कधी ग्रामसभा कळलेली असते, ना कधी पुढाकार घेऊन कसले कामे केलेली असते. ग्रामसभेत लोकांना उत्तर देण्याची देखील त्यांच्यात धमक नसते. लोकांना सामोरे जाण्यासाठी लोकप्रतिनिधीत हिंमत नसते.
अशी कित्येक गावात उदाहरणे आहेत,एक साधे अभियान देखील राबवण्याची धमक नसलेले लोकप्रतिनिधी गावाचा खरोखरच उद्धार करतील का? हे प्रश्न सर्वसामान्यांना का पडू नये.पुढची पाच वर्ष कधी संपेल? हा विचार करणारे लोकप्रतिनिधी देखील आजही अनेक गावात आहेत.मनापासून काम करणारे कार्यकर्ते कधीच निवडणुकीच्या रिंगणात फारशी उतरत नाहीत. त्यांना सत्तेचा मोह नसतो.सातत्यपूर्ण गावाच्या हितासाठी काही आपण योगदान देऊ शकतो का ? या विचारात त्यांचे आयुष्य सुरू असते.
‘मॉडेल गाव’ घडवायला हवे.
अशा लोकांना शोधणं आणि संधी देणे गावासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आपण सूज्ञ सुशिक्षित नागरिक आहोत. विचारी आहोत. समजदार आहोत. संत तुकारामापासून तुकडोजी पर्यंतचा आधुनिक विचार मांडणारे आणि सांगणारे आहोत.पुढची पाच वर्ष नव्हे तर वर्षानुवर्षे गावात शांततेचे वातावरण निर्माण करायचं असेल,तर विकासाचं एक ‘मॉडेल गाव’ घडवायला हवे..
विकासाचं एक मॉडेल गाव घडवायचं असेल तर गाव विकास करणाऱ्या नागरिकांच्या बाजूने उभे रहा..एक बाटली, पाचशे रुपये आणि मटण ताट संपली आपली लायकी..लोकांना नोटा दिल्या जातात.धाब्यावर जेवण घातले जाते. मटणाच्या पिशव्या घराघरात पोहोच केल्या जातात. ग्रामीण भागात राजकारण म्हणजे दिवाळीच असते.
दारूड्यांना मुबलक मोफत दारू पाजली जाते.
त्यांची उतरली की पुन्हा त्याच्या पोटात दारूचे निशुल्क भरले जाते. एरव्ही गावात सात आठलाच डुलकी घेणारे चौकात रात्रभर जागे राहतात. गल्ल्यागल्यावर पाळत ठेवली जाते. गुपचूप पैसे वाटले जातात. या सगळ्यातून वैचारिक बांधिलकी असणारे विकासाचे व्हिजन असणारे उमेदवारांना पराभूत केले जाते. या सगळ्याला जनतेची उघड सहमती असते. कारण जनतेचे हात मटन चिकन खाऊन बटन दाबण्यासाठी आतुरलेले असतात.
दारू पीऊन मटन खाऊन बटन दाबनारांनो लोकशाहीला विकू नका..
निवडणुकीत गावातील लोकांना पैसा वाटून दारु मटन देऊन खर्च करत असेल आणि तो जर निवडून आला तर तो गावाचा विकास वा लोकांचे काम कशाला करेल?जर लोकांचेच काम करायचे तर मग तो पैसा दारू मटन कशाला देईल.तरूण वर्गाने आपल्या मेंदूची बंद पडलेली दार उघडून भान ठेवणे आवश्यक आहे.
प्रत्येक गावामधून निर्भीड प्रामाणिक तरूण नेतृत्व पुढे आले तर गावाचा विकास होईल.लोकशाहीने ज्या जनतेला सर्वोच्च स्थान दिले तीच जनता स्वतःला निवडणुकीच्या बाजारात विकायला तयार होते. यामुळे प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचाच बाजार सुरू आहे.अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असू शकते. त्यामुळे नागरीकांनो मटन खाऊन बटन दाबून लोकशाहीला विकू नका..
श्रमिकराज जनरल कामगार संघटना व जनआंदोलन महाराष्ट्र राज्य शेवगाव तालुका अध्यक्ष . 9307925328
*अविनाश देशमुख शेवगांव.
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार.
Leave a Reply