दीड वर्षाच्या मुलाचा खेळताना ट्रॅक्टरवरून पडल्याने मृत्यू |
नाशिकरोड : एकलहरा मातोश्री कॉलेजजवळील वीटभट्टीजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असताना चुकून चावी फिरल्याने ट्रॅक्टर सुरू होऊन ट्रॅक्टरवरून पडल्याने दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरा येथील मातोश्री महाविद्यालयजवळ सोनू भीमराव सरदुसे यांची वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम चालू होते. त्या ठिकाणी असलेल्या कामगारांची मुले खेळत होती.
वीटभट्टीजवळ एकट्रॅक्टर उभा होता. यावेळी दीड वर्षाचा मुलगा अनिकेत लवकुश गौतम हा खेळत खेळत त्या ट्रॅक्टरवर चढला. त्याने चावी ट्रॅक्टरला लावून फिरवली. त्यामुळे अचानक ट्रॅक्टर सुरू झाल्याने अनिकेत खाली पडून गंभीर जखमी झाला.
त्याला जास्त मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वीटभट्टीवरील कामगारांची चांगलीच धावपळ उडाली होती. अनिकेत याचे आई-वडील उत्तर प्रदेशचे असून कामानिमित्त येथे आल्याचे समजते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
Leave a Reply