नोटा मोजता मोजता थकले 190 कोटींचे घबाड सापडले.
नोटा मोजता मोजता थकले 190 कोटींचे घबाड सापडले. |
जालन्यात आयकर विभागाची कारवाई घर कंपनीवर टाकले छापे.
जालना प्रतिनिधी : शहरातील तीन स्टील उत्पादकांसह एक खाजगी फायनान्स वर सहकारी बँकेवर छापे टाकून जवळपास 190 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याचे आयकर विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यात 120 कोटी रुपयांचा बेहिशोबी स्क्रॅप 56 कोटी रुपयांची रोकड आणि चौदा कोटी रुपयांचे सोने यांच्या समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जालना : येथील कालिका स्टील एस आर जे स्टील गजकेसरी स्टील स फायनान्स वर विमल डीलर प्रदीप बोरा यांच्या निवासस्थानी आणि कंपन्या सहित यांच्या फार्महाऊसवर आयकर विभागाने एक ते आठ ऑगस्ट दरम्यान अचानक छापे टाकून ही कार्यवाही केली यातील एस आर जे स्टीलच्या जुना जालना भागातील निवासस्थानी आणि कंपनीत हे छापे टाकण्यात आले.
तसेच कालिका स्टील च्या संचालकांच्या निवासस्थानी आणि फार्म हाऊस वर कारवाई करण्यात आली तेथे मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली जालन्यातील विविध सहकारी तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये या तिन्ही कंपन्यांच्या मालकांनी त्यांच्या कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या नावे 30 पेक्षा अधिक लोकर घेऊन त्यात मोठ्या प्रमाणावर रोग प्रथम ठेवल्याचे आढळून आले लोकर मधील रक्कम तसेच फार्म हाऊसवरील रक्कम अशी एकूण 56 कोटींची रोख रक्कम आढळून आली त्यात बेडखाली लपवलेल्या नोटा होत्या.
बनावट कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे.
कोलकाता येथील बनावट कंपनीचे शेअर अधिकच या दराने खरेदी केल्याने दाखवून देते गुंतवणूक केल्याचे उघड झाले ही रक्कम मी काही कोटीत असल्याचे सांगण्यात आले यातून जीएसटीचे देखील चोरी केल्याचे दिसून आले परंतु याची चौकशी झाली नसल्याने सांगण्यात आले जाण्या प्रमाणे त्या कंपन्यांच्या औरंगाबाद मुंबई आणि नाशिक येथील कार्यालयात ही छापे टाकून चौकशी करण्यात आली आयकर विभागाने गुरुवारी दिलेल्या निवेदनात आणखी चौकशी सुरू असल्याचे नमूद केले आहे.
रोकड मोजायला लागले दीड दिवस.
आयकर विभागाने जप्त केलेली जवळपास 56 कोटीची रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना दीड दिवसाचा कालावधी लागला.
जालन्यात या तिन्ही कंपन्यांमध्ये लोखंडी सगळ्या अर्थात स्टील बार निर्मितीसाठी स्क्रॅपची गरज पडते.
असे असताना या एकशे वीस कोटी रुपयांच्या स्क्रॅप च्या कुठल्याच नोंदी नसल्याने दिसून आले.