पिंपळनेर शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

पिंपळनेर शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

पिंपळनेर – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा कार्यकर्ता मेळावा पिंपळनेर येथे दि. 4 जून 2023 रविवार रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. स्थळ- मराठा मंगल कार्यालय, शनी मंदिराजवळ पिंपळनेर ता. साक्री, जि.धुळे .वेळ – 10-30 ते दुपारी 4 पर्यत .या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक महासंघाचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.सुभाषजी बसवेकर साहेब राहतील.

सदर मेळाव्यासाठी धुळे ,नंदुरबार, नाशिक व जळगाव या चार जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात कार्यकर्त्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. 

सदर कार्यक्रमासाठी मर्यादित जागा असल्यामुळे नाम मात्र शंभर रुपये शुल्क संघटनेच्या क्युआर कोडवर भरून त्वरित आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाषजी बसवेकर साहेब यांनी केलेले आहे.

अधिक माहितीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे साक्री तालुका कार्याध्यक्ष- श्री. प्रविण थोरात. मो.8668791979 यांच्याशी संपर्क साधावा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !