पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही सरकारी ऑफिस मध्ये पार्किंग मोफत असते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे नागपूर येथील जेष्ठ कार्यकर्ते श्री विलास ठोसर यांचा अनुभव
सिटी पोष्ट ऑफिस, टांगा चौक, इतवारी, नागपूर येथील पोष्ट ऑफिस ग्राहकाकडून पार्किंग शुल्क 10 रू घेत होते आज मला स्वतःच या पोष्ट ऑफिस मधे काम होते.पार्किंग चे 10 रू लागतील असे पार्किंग वाले म्हणाले. मी तेथील पोष्ट मास्टर श्री.ए.जे. सरकार यांना भेटलो व त्यांना विचारले की पोस्टाचे ग्राहक पोस्टात येतात त्यांनी वाहन कुठे ठेवावे.
ग्राहकांनी 1 रुपयाची रेव्हीन्यू तिकिट करीता 10 रुपये पार्किंग साठी द्यायचे का?
ग्राहकांकडून आपण पार्किंग शुल्क कोणत्या आधारावर घेत आहात.
पोस्ट मास्तर प्रथम म्हणाले वरूनच पार्किंग चे आदेश आहेत. आदेशची प्रत मागीतली तर त्यांनी त्या पार्किंग वाल्याला बोलावले त्याला विचारले की तुला कुणी ठेका दिला.
पार्किंग वाल्या ठेकेदाराने सांगितले की वरीष्ठ पोस्ट मास्तर यांनी जे तुमच्या आधी येथे होते ते सेवानिवृत्त झाले आहेत.
तेव्हा आजचे वरीष्ठ पोस्ट मास्तर श्री.ए.जे. सरकार यांनी ठेकेदार यांना आदेश दिले की पोस्टात येणाऱ्या ग्राहकाकडून पार्किंग शुल्क घेऊ नये जर घेतल्यास तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. यानंतर पार्किंग शुल्क घेतले जाणार नाही असे श्री सरकार यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ला सांगितले.
त्वरित कार्यवाही केल्याबद्दल पोस्ट मास्तर श्री सरकार यांना धन्यवाद दिले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे माहितीपत्रक त्यांना भेट दिले
विलास ठोसर,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर महानगर,
फोन 7757009977
Vilas Thosar
श्री विलास जी ठोसर यांचे केंद्रीय कार्यकारिणी मार्फत अभिनंदन.
Leave a Reply