![]() |
बहिणीच्या सासरच्यांनी केली मारहाण; साल्याने केला गुन्हा दाखल |
नाशिक रोड : बहिणीच्या सासरच्यांनी कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एकलहरा कॉलनी येथील सागर राजेंद्र वंजारे याच्या बहिणीने चार वर्षांपूर्वी संदीप अशोक लाल ऊर्फ बाबू मुख्तार मणियार (राजवाडा, ) देवळालीगाव याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. शुक्रवारी सकाळी संदीप अशोकलाल याने सागर वंजारे याला फोन करून पत्नी संध्या हिला तुम्ही घरात लपविले आहे का, अशी विचारणा केली.
सागर व त्याची बहीण श्रद्धा हिने संध्या आमच्या घरी आली नसल्याबाबत स्पष्ट केले. दुपारी नाशिकरोड पोलिस ठाण्यातून सागरला फोन करून बोलवून घेण्यात आले.
सागर, त्याची आई व दोन बहिणी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशी आल्या असता संदीप लाल ऊर्फ बाबू मुख्तार मणियार, सुब्रण अशोक लाल, मालती अशोक लाल यांनी सागरला शिवीगाळ करून मारहाण केली.