बालविवाहाला उपस्थित राहाल तर दोन वर्षे कोठडीत जाल ! कायद्याने ठरतो गुन्हा : पालकांसह नातेवाइकांना होऊ शकते शिक्षा .
विभागीय प्रतिनिधी : कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय २१, तर मुलीचे वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यापूर्वी विवाह केल्यास गुन्हा ठरतो. अशा प्रकारे अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह करणे तसेच जुळविणाऱ्यांवर कारवाई होतेच, शिवाय उपस्थित राहणाऱ्यांना २ वर्षे जेलची हवा खावी लागू शकते. लग्ससराई सुरू असल्याने सनई चौघडे वाजू लागले आहेत. विवाह ठरलेल्यांची लगीनघाई सुरू असून इच्छुकांच्या कुटुंबाकडून विवाह जुळून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच विवाहासाठी मुली मिळत नसल्याने बालविवाहाचे प्रकार वाढले आहेत.
बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा बालविवाह कायद्याने ठरतो गुन्हा. |
बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा २००६ अंतर्गत.
असा विवाह जुळून आणणाऱ्यांसह विवाह उपस्थित दंड आणि दोन वर्षे राहणाऱ्यां कोठडीची शिक्षा होऊ शकते. पोलीस ठाणे 25. विवाहासाठी कायद्याने मुला- मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे बालविवाह गुन्हा आहे. असा विवाह जुळवून आणणे, त्यास उपस्थित राहणेदेखील गुन्हा असून दंड आणि जेलची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बाहविवाह होत असल्यास प्रशासनाशी संपर्क साधवा.
– अॅड. मिलिंद बाबर, अध्यक्ष जिल्हा बालकल्याण समिती.
बालविवाहाच्या तक्रारी आल्यास चौकशी करून वधू-| वरांचे पालक व अन्य नातेवाइकांवर गुन्हा नोद्विण्यात येईल.
बालविवाह काय आहे कायदा?
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार विवाहाचे वय निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार मुलींचे वय १८ तर मुलांचे वय २१ वर्षे असावे. यापेक्षा कमी वय असणाऱ्यांचा बालविवाह घडवून आणणे, उपस्थित राहणे, त्यास प्रोत्साहन । देणे व इतर गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
बालविवाहास लाखाचा दंड अन् दोन वर्षे कारावास.
त्या १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरी व एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.| बालविवाह ठरविणाऱ्यास किंवा | प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षे सक्त मजुरी, एक लाख दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संबंधित वधू-| वरांचे पालक व अन्य नातेवाइकांनी विवाह घडविण्यास मदत केल्यास| त्यांनाही शिक्षा होऊ शकते.
आपल्या क्षेत्रात बालविवाह झाल्याने दिसल्यास मोफत टोल फ्री नं आहे. आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नं गुपित ठेवण्यात येणार.
बालविवाह प्रतिबंधात्मक टोल फ्री नं – 1098
Leave a Reply