महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांना अधिसन्ख्य बोगस आदिवासींना दिलेले संरक्षण रद्द करणे व आदिवासी विभागातील आयुक्तपदी नेमणूक झालेली धनगर जातीच्या नयना गुंडे यांची बदली रद्द करण्याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष यांनी दिले निवेदन.
ब्रेकिंग न्यूज नागपुर :- दि 22 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांची हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन.
दि 6 जुलै 2017 रोजी मा सुप्रीम कोर्टाने खर्या आदिवासींच्या जागी खोटे सर्टिफिकेट मिळवून बोगस आदिवासींनि बळकावलेला जागा रिक्त करून खर्या आदिवासींची पदभरती करावी.
या निकालाचा राज्य शासनाने अवमान करून बोगसांना वाचविण्यासाठी अधिसन्ख्य पदाचा शासननिर्णय काढून त्या माध्यमातून दि 29 नोव्हें 2022 रोजी अधिसंख्य केलेल्या बोगसांसाठी संरक्षण देणारा कायदा मंजूर करून दि 14 डिसेंबर 2022 रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा व मा सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अमलबजावणी करून खर्या आदिवासींची पदभरती करावी व खोटे सर्टिफिकेट घेउन खर्या आदिवासींच्या जागा बळकावणारयांवर गुन्हे दाखल करावे*,*धनगर जातीच्या असलेल्या नयना गुंडे यांची आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक पदावर केलेली नियुक्ती रद्द करून त्याजागी कोणत्याही समाजाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये ,सिंदखेडा दोंडाईचा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी आदिवासी भिल्ल समाजाला जातिवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर दोंडाईचा पोलीस स्टेशन मध्ये दोन महिने झाले अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असूनही त्याला अटक झालेली नसल्याने आरोपी मोकाट फिरतोय त्यामुळे आरोपी जयकुमार रावल यांना व त्यांच्या साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी.
शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वाढलेल्या महागाईमुळे डी बी टी 7 हजार ते 8 हजार रुपयेने वाढ करण्यात यावी व 3 महिने अगोदर डी बी टी मिळावी अन्यथा डी बी टी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी ,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागु असलेली पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेत वाढलेल्या महागाईमुळे 10 हजार ते 12 हजार रुपयेने वाढ करण्यात यावी ,पी. एच. डी धारक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती सुरू करावी ,अनुसूचित क्षेत्रातील पेसा शिक्षक पदभरती व इतर विभागातील पेसा पदभरती करावी ,आदिवासींची 2017 सालाची रखडलेली विशेष पदभरती करावी
,सह्याद्रीतिल अनुसूचित क्षेत्रातील कसारा घाटाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे नाव द्यावे ,सह्याद्रीतल्या अनुसूचित क्षेत्रातील भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर नाव द्यावे , वीर बाबुराव शेडमाके यांच असलेले स्मारक गडचिरोली शहरात सन्मानाने बसवावे ,आदिवासींची स्वतंत्र जणगणना करावी ,आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड 7 देण्यात यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुंबई ,पुणे,नागपुर,औरंगाबाद,अमरावती नाशिक अशा मोठ्या शहारांमध्ये निवासी एम.पी.एस .सी / यु.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्र सुरु करावे.
मरांग गोमके जयपालसिंग मुंडा यांचा इतिहास राज्यातील सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रमात घ्यावा,आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे या सर्व समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ प्रदेश युवा अध्यक्ष तथा भिवापूर पंचायत समितीचे उपसभापती राहुलभाऊ मसराम,कट्टर आदिवासी प्रतिष्ठान (के ए ग्रुप)संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवारी, प्रदीपभाऊ गोडे, सुशीलकुमार चिखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply