मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी हजारो रुपये चोरले.पोलीस स्टेशन मध्ये केला गुन्हा दाखल.

शेवगांवच्या गजबजलेल्या परिसरातील ऐतिहासिक महादेव मंदिरामधील दानपेटी फोडुन हजारो रुपये चोरटयांनी लांबवीले शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

शेवगांव शहरात दंगल झाल्यापासून चित्र विचित्र घटना घडत असुन काही दिवसांपूर्वी धनगर गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात चोरटयांनी पळत ठेऊन दानपेटी फोडुन हजारो रुपयांचा ऐवज चोरला यां संधर्भात शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये महादेव भक्त श्री जगदीश शेठ धूत आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील उर्फ बंडूशेठ रासणे व परिसरातील नागरिक यांनी गुन्हा दाखल केला असुन अतिशय गजबजलेल्या आणी कायम रहदारी असलेल्या  

मारवाड गल्ली धनगरगल्ली यां परिसरातील ऐतिहासिक महादेव मंदिरामधील दानपेटी फोडुन हजारो रुपये अज्ञात चोरटयांनी लांबवीले शेवगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असुन चोरटयांनी दानपेटी फोडुन रोख रक्कम लांबविली चिल्लर आणि दानपेटी तिथेच टाकुन पळ काढला आधीच यां परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेली दंगल त्यानंतर बलदवा दरोडा व भीषण हत्याकांड नंतर स्व. कचरूशेठ धूत यांच्या घरी दरोड्याचा यशस्वी प्रयत्न आणि आता महादेव मंदिरात चोरी त्यामुळे परिसरातील नागरिक महिला अबाल वृद्ध भयभीत आहेत* यां चरीचा तपास पी. आय. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगांव पोलीस करत आहे 

ताजा कलम.

गेल्या काही दिवसांपासुन काही परप्रांतीय लोक संशयित अवस्थेत गृहपयोगी वस्तु विकताना लोकांनी त्यांना जाब विचारून हाकलुन दिले व यां संधर्भात शेवगांव पोलीस स्टेशन ला तक्रार केली आहे यां भागात नागरिकांनी माहेश्वरी युवक मंडळाच्या कार्यकत्यांनी श्री भगवान शेठ धूत यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त सुरु केली आहे यां पार्श्वभूमीवर शेवगांव पोलिसांनी शहरात काही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे* 

विशेष बाब.

यां मंदीर परिसरात काही भामटे स्थानिकांनी संशयास्पद परिथितीत फिरताना पहिले आहेत चोरी त्यांनीच केली असेल अशी दबक्या आवजात चर्चा सुरु आहे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ???? ते भामटे कोण विचत्येत “मी शेवगांवकर”

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !