‘मनरेगा’अंतर्गत समृद्ध शेतकरी योजना फक्त नावालाच! गाय गोठा योजनेचा लाभ एकाही शेतकऱ्याला नाही
ग्रामीण बातम्या : बेलोना ग्रामपंचायतीमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत समृद्ध शेतकरी योजना केवळ नावालाच असून, या योजनांचा लाभ एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. पाळीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेली गाय गोठा अनुदान योजनेसाठी एकही शेतकरी पात्र ठरलेला नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांकडे शेतीसोबत जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, कोंबड्या, शेळ्या असतात. त्यांचे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांना गाय गोठा अनुदान योजना उपयुक्त ठरते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख हेतू आहे; परंतु बेलोना ग्रामपंचायतीअंतर्गत २०२१च्या.
आमसभेमध्ये पाच शेतकऱ्यांना गोठे मंजूर झाले; मात्र वेगवेगळे निकष सांगून एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सरकारी योजना फक्त नावालाच शिल्लक आहे का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे. अशाच योजना असतील तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
Leave a Reply