माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू आसतात. डोकं शांत राहत नाही सकाळी पण लवकर जग येते पण अंथरूनातून उठू वाठात नाही .
Sleep Disorders In Marathi |
रिकाम्या डोक्यात विचारांची भुतं घिरट्या घालतच राहणार! अश्यावेळी शरीराला आणि मेंदूला कामाला लावा. प्रश्नामध्ये विचारणाऱ्याची मनःस्थिती उदासीन आणि चिंताग्रस्त वाटते. आपण चिंता करण्याच्या मुळा पर्यंत जा, ही मनःस्थिती का होतेय याचे कारण शोधा, कारण नक्की सापडेल, त्यावर उत्तर शोधा.
अशी मनःस्थिती जीवनात ध्येय नसतील तर उद्भवते. दोन ध्येय ठरवा, एक अल्पकालीन ध्येय आणि दुसरे दीर्घकालीन असावे. रोज अल्पकालीन ध्येयावर काम करा आणि जे काम करताय त्याने दीर्घकालीन ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा.
वाचण्याचा छंद असेल तर आर्थिक वृद्धी वर आधारित पुस्तके वाचा, शिक्षण/जॉब मध्ये मदत होईल असे काही वाचा. वाचन केल्याने मेंदूला चालना मिळते, दिवसाचे व्यवस्थित नियोजन करा. जे कार्य तुम्ही दिवसा कराल तेच रात्री तुमच्या विचारांमध्ये राहील. शारीरिक श्रम करा, योगासने किंवा जिम ला जा, नसेल जमत तर किमान अर्धा तास चालणे/धावणे हे करा. आंबट शौकीन वृत्ती, अश्लील विडिओ च्या आहारी गेला असाल तर या वाईट गोष्टी हळू हळू करून कायम च्या बंद करा. या गोष्टी आपल्या नकळत मेंदूला सुन्न करतात, आपण स्वतःमध्ये अडकून राहतो. या गोष्टींमुळे बौद्धिक विकास होत नाही आणि शारीरिक दृष्ट्या उदासीनता येते. कुठे लक्ष लागत नाही. त्यामुळे शरीराला पोषक असे वातावरण तयार करा.
हेही वाचा : Breaking News | लिंक
सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ किंवा रेकॉर्डिंग केल्यास गुन्हा नाही लिंक
Self Discipline is a key to successful personality! स्वतःला शिस्त लावणे आणि ती पाळणे ही उत्तम व्यक्तिमत्वाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता हे वाचून आळस झटकून द्या, वाईट संगती अथवा विचारांमधून स्वतःला बाहेर काढा, जागे व्हा, ध्येयाच्या मागे असे लागा की याशिवाय आयुष्यात काही नाही. आणि मग पहा शिस्तबद्ध राहिल्याने आयुष्यात किती अमुलाग्र बदल होतात. तुमचा आत्मविश्वास आभाळ गाठेल, तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटू लागेल. सुरुवात करा आणि कामाला लागा!!
कधी कधी पोट साफ होत नाही / त्या मुळे पण झोप येत नाही आणि जेव्हा आपल्याला गरम होते किंवा उकडते तेव्हा पण झोप येत नाही. तुम्ही म्हणालात की पहाटे झोप लागते. कारण की पहाटे वातावरण खुप छान असते थंड असते म्हणून तुम्हाला चांगली झोप येते. तुम्ही झोपायच्या आधी सकारात्मक विचार करा थंड हवा येईल अशा ठिकाणी झोपा. कधी झोप येईल ते कळणार पण नाही.
तुमच्या जीवनात अशी कोणती तरी अशी गोष्ट घडली असेल की तूम्ही त्या गोष्टी चा खुप विचार करत असाल. त्या मुळे पण कधी कधी झोप लागत नाही. झोपताना त्या च गोष्टी चा विचार मनात येतो. म्हणून पण झोप लागत नाही. तुम्ही झोपताना तुमच्या जीवनात खुप चांगली गोष्ट घडली असेल त्याचा विचार करा. तुम्हाला खुप मस्त वाटेल.