महत्त्व ७/१२ उताऱ्याचं |
बऱ्याचदा जमीन, भूखंड वा प्लॉटशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये ७/१२ उताऱ्याचा उल्लेख ऐकायला मिळतो. जमीन मालकासाठी हा कागद खूप महत्त्वाचा असतो. जमीन मालक असाल किंवा बनणार असाल तर ७/१२ उतारा नेमका काय असतो, तो का महत्त्वाचा असतो आणि त्याचा काय उपयोग होतो, हे जाणून घ्यायला हवं.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जमिनीचं एक रजिस्टर असते, ज्यामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक जमिनीच्या तुकड्याची माहिती असते. या रजिस्टरचा एक भाग म्हणजे सातबारा (७/१२) होय. सातबारा हा संबंधित जमीन वा प्लॉटची पूर्ण माहिती देण्याचं काम करतो. म्हणून जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात तो खूप महत्त्वाचा समजला जातो.
महाभूलेख (https://bhulekh.mahabhumi. gov.in/) ही महाराष्ट्राची भूमी अभिलेख वेबसाइट आहे. या
वेबसाइटवर नागरिकांना ७/१२ उतारा आणि ८ए दस्तऐवज सातबारा म्हणून ऑनलाइन उपलब्ध होतो. राज्यातल्या जमिनींची कागदपत्रं शोधणं, डाऊनलोड करणं आणि ती प्राप्त काढण्याचं व्यासपीठ म्हणून ही वेबसाइट काम करते. ही दोन्ही कागदपत्रांतून जमिनीची भूतकाळातली मालकी आणि त्या जमिनीशी संबंधित विवादांची माहिती मिळते.
लोकांना फ्लॅट किंवा अपार्टमेण्ट खरेदीशी संबंधित नियम माहित असतात, परंतु महाराष्ट्रात प्लॉट घ्यायचा असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल, याची पूर्ण माहिती नसते.
7 / 12 च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
७/१२ उतारा हा महाभूलेखातला महत्त्वाचा दस्तावेज आहे. वास्तविक, ऑनलाइन सातबारा दस्तावेज ही भूखंडाची मालकी निश्चित करण्याची गुरुकिल्ली आहे. कर्जाचे करार, पीक सव्र्व्हेक्षण आणि इतर सरकारी सुविधा मिळवण्यासाठी सातबारा पावत्यांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.
महाभूलेखात पाहिल्याप्रमाणे ७/१२ उतारा ऑनलाइन महसूल विभागाकडून तहसीलदारामार्फत दिला जातो.