महावितरण च्या अधिकाऱ्यांना वीज बिल वसुली केली नाही म्हणुन एक लक्ष रुपये दंड वीजग्राहक बिल भरत नाही म्हणुन अधिकाऱ्यांना दंड मासिक पगारातून केला वसुल.
अविनाश देशमुख शेवगांव.
महावितरण ची अर्बन शहरी विभागाची शेवगाववात थकलेली वीज बिले ठरत आहे. महावितरण च्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची डोकेदुखी बिल वसुली साठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्या त्या भागातील गावपुढाऱ्यांचा होतो. त्रास बरेचशे कर्मचारी आणि अधिकारी बाहेरगावचे व पार जिल्ह्यातील आल्याने ते आपला जीव मुठीत धरून कामं करत आहेत वीज ग्राहकांनी बिल नाही भरल्यास येत्या काळात खासगीकरण होऊन मग आपल्याला जसे आपण मोबाईल चे बिल भरून महिनाभर मोबाईल वापरतो तसे विज वापरावी लागेल.
याची सुरवात आधी सरकारी कार्यालये मग इंडिस्ट्रीअल एरिया नंतर व्यापारी आस्थापने मग सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहक अशाप्रकारे टप्प्या टप्प्याने खासगीकरण होईल मग अधिकारी कर्मचारी ग्राहक सर्वचजण यां दृष्ट फेऱ्यात भरडले जाणार आहेत वेळेवर सावध व्हा आपली जबाबदारी वापरलेल्या विजेचे बिल भरा नाहीतर महावितरण बंद व्हायला वेळ लागणार नाही सरकारचे धोरण तोट्यात चालणारे सारे उद्योग खासगी करून जनतेकडून अव्वाच्या सव्वा बिल वसुल करायचे हे धोरण दिसते
ताजा कलंमं.
*शेवगांव शहरातील काही भागात आणि काही गावपुढाऱ्यांकडे हजारो लाखो रुपयांची थकबाकी आहे ती नियमित वसुल झाल्यास कार्यालयास दंड होणार नाही एका सरकारी बड्या अधिकाऱ्याची सुमारे लाखभर रुपयाची बाकी आहे वसुली पथकाची अवस्था वीजग्राहक बिल देईना आणि टार्गेट कम्प्लिट झाले नाही म्हणुन महावितरण दंड वसुल करतंय अशी झाली आहे.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply