माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न.

पिंपळनेर-येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर, ग्राहक फाउंडेशन साक्री तालुका व      श्रीराम समर्थ बहुउद्देशीय संस्था पिंपळनेर,यांच्या संयुक्त विद्यमाने व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक मा.श्री. कांतीलालजी जैन साहेब यांच्या आदेशाने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर कर्म. आ.मा. पाटील विद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी 10 ते 1 या वेळात आयोजित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपप्राचार्य मा.श्री. डी.टी. पाटील सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हंसराजजी शिंदे व श्री. रोहिदास सावळे सर उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे.

या प्रसंगी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा स्नेहवस्ञ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पिंपळनेर येथील संशोधक व शास्त्रज्ञ श्री. प्रशांत बागुल यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून श्री. प्रविण थोरात यांनी उपस्थितांना  माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचे विस्तृत व सखोल मार्गदर्शन केले.

माहितीचा अधिकार हा कायदा म्हणजे काय?

माहितीचा अधिकार हा कायदा म्हणजे एक प्रभावी शस्त्र आहे, त्याचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करा, कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.शासन हा कायदा निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी खंत यावेळेस श्री. थोरात यांनी व्यक्त केली.हे प्रशिक्षण जवळजवळ  तिन तास पर्यंत चालले.यावेळेस उपस्थित प्रशिक्षणार्थीना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याबद्दल सखोल माहिती देण्यात आली ,तसेच विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली.

 प्रशिक्षणार्थींकडून माहिती मिळवण्यासाठी करावयाचा अर्ज प्र पत्र अ (नमुना अर्ज )हे प्रत्यक्ष भरून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात मा.श्री. डी. टी.पाटील सर म्हणाले आदरणीय श्री.अण्णा हजारे साहेब यांच्या प्रचंड संघर्ष , व अथक प्रयत्नातुन  हा कायदा तयार झालेला आहे. त्याला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.  असा संदेश दिला.

 या  प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी म्हणून श्री. रावसाहेब शिंदे,श्री. भरत बागुल, श्री.प्रमोद जोशी ,श्री. चंद्रकांत अहिराव ,श्री.प्रशांत कापडणीस,श्री. मुकुंद खैरनार,श्री. अरुण गांगुर्डे,श्री. लक्ष्मीकांत अहिरराव,श्री. अनिल महाले,श्री. हेमंत पाटील ,श्री.सोमनाथ बागुल,श्री. हंसराजजी शिंदे,श्री.राजेंद्र एखंडे,श्री. देविदास बर्डे,श्री.अतिराम ठाकरे, इत्यादींनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व कायद्याचे पुस्तक भेट  म्हणुन देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल महाले सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. आभार प्रदर्शनानंतर अध्यक्षांच्या परवानगीने शिबिराची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !