माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर उत्साहात झाला संपन्न.
पिंपळनेर – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर व अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर पिंपळनेर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष मा. श्री.सुभाषजी बसवेकर साहेब लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए .पी.आय. मा. श्री. सचिनजी साळुंखे साहेब, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.श्री. सुरेंद्रजी दादा मराठे साहेब , कर्म.
आ.मा. पाटील विद्यालयाचे माजी आदर्श प्राचार्य मा.श्री. अे.बी. मराठेसर, महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. श्री. महेश पाटील साहेब( नाशिक) ,महासंघाचे कार्यकारणी सदस्य मा.श्री. साहेबराव वाघ साहेब (मालेगाव), महासंघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. पुनमचंद मोरे साहेब व पिंपळनेर शहराचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. पी .एस. दादा साहेब हे होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेरचे कार्याध्यक्ष श्री. प्रविण थोरात यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली .मा. श्री.सुभाषजी बसवेकर साहेबांनी प्रशिक्षण शिबिरात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याबाबत उपस्थितांना चर्चेतून सुंदर असे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरासाठी धुळे, नंदुरबार ,जळगाव व नाशिक या चार जिल्ह्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यात -श्री. महेश पाटील,श्री. सुभाष दराडे,श्री.माधवराव दोरीक,श्री. हिरालाल कोळी,श्री.पंकज पाटील,श्री. पंढरीनाथ कन्हुर,श्री.सोनु माळी, अॅड.विशाल मावळे, मुजमीन शेख,श्री. महेंद्र जाधव,श्री. कृष्णा शेटे, भिमाबाई गांगुर्डे,श्री.शरद मराठे,श्री. मधुकर पाटील,श्री. प्रमोद गोलेचा, सौ.जयश्री गोलेचा,श्री. संतोष तडवी,श्री.देवानंद ठाकूर, अनिता सापटे,श्री.राजेश बावळेकर,श्री.कुशाल वसावे,श्री. जयेश बागुल,श्री.अजय अहिरे,श्री. गणपत ठाकरे,श्री. दारासिंग ठाकरे,श्री. सईद कुरेशी,श्री. हेमंत वळवी .इत्यादी उपस्थित होते.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर मार्फत उपस्थित सर्वांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री .अनिल महाले सर यांनी केले.
तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.प्रविण थोरात, श्री.कैलास भदाणे,श्री. रोहिदास सावळे,श्री. हंसराजजी शिंदे,श्री. रावसाहेब शिंदे, श्री. दिनेश भालेराव, श्री. प्रमोद जोशी, श्री.प्रशांत कापडणीस,श्री.चंद्रकांत अहिरराव, श्री.लक्ष्मीकांत अहिराव, श्री. पराग महाजन, श्री. अनिल महाले,श्री. किरण शिनकर, श्री.मुकुंद खैरनार, श्री. राजेंद्र एखंडे, श्री. अरुण गांगुर्डे, श्री. उमेश गांगुर्डे,श्री. कन्हैयालाल गांगुर्डे, श्री.धनंजय देवरे,श्री. सोमनाथ बागुल,श्री.हेमंत पाटील, श्री.राजेंद्र भदाणे, श्री. निशांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply